४० वर्ग, २००० सीटचे अम्फीथिएटर, ३ लाख पुस्तकांचा संग्रह; पाहा भव्य दिव्य नालंदा विद्यापीठ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 02:58 PM2024-06-19T14:58:52+5:302024-06-19T15:48:52+5:30

PM Narendra Modi Nalanda University Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन केले.

PM Narendra Modi Nalanda University Photos: पंतप्रधानाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या राजगीर मधील ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले.

नालंदा विद्यापीठात पंतप्रधान मोदी यांनी विद्यापीठाच्या ऐतिहासिक वारशाला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी बोधी वृक्षाचे रोपण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन केले. २०१७ मध्ये विद्यापीठाचे बांधकाम सुरू झाले होते.

२०१६ मध्ये, नालंदाचे अवशेष संयुक्त राष्ट्रांनी वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते, त्यानंतर २०१७ मध्ये विद्यापीठाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.

नालंदाच्या प्राचीन अवशेषांजवळ विद्यापीठाचा नवीन परिसर बांधण्यात आला आहे. या नवीन कॅम्पसची स्थापना नालंदा विद्यापीठ कायदा, २०१० द्वारे करण्यात आली आहे.

२००७ मध्ये फिलीपिन्समध्ये झालेल्या दुसऱ्या पूर्व आशिया शिखर परिषदेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याची तरतूद करण्यात आली.

नालंदा विद्यापीठात दोन शैक्षणिक विभाग आहेत, ज्यात ४० वर्ग आहेत. येथे एकूण १९०० मुलांची बसण्याची व्यवस्था आहे. विद्यापीठात ३०० आसन व्यवस्था असलेली दोन सभागृहेही आहेत.

नालंदा विद्यापाठीमध्ये सुमारे दोन हजार लोकांची आसनक्षमता असलेले आंतरराष्ट्रीय केंद्र आणि ॲम्फी थिएटरही बांधण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी फॅकल्टी क्लब, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सुविधा आहेत.

नालंदा विद्यापीठाचा परिसर हा 'NET ZERO' कॅम्पस आहे, म्हणजेच येथे पर्यावरणपूरक उपक्रम आणि शिक्षण होते.

कॅम्पसमध्ये पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी एक प्लांट, १०० एकर जलकुंभ तसेच पर्यावरणपूरक अनेक सुविधा आहेत.

सर्व फोटो सौजन्य- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट