Narendra modi birthday : लेखक नरेंद्र मोदी! ही आहेत त्यांनी लिहिलेली काही पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 03:32 PM2019-09-17T15:32:28+5:302019-09-17T15:56:40+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना सगळीकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी भाषणशैलीविषयी तुम्हा सर्वांना माहितच असेल. पण मोदी हे उत्तम लेखकही आहेत. त्यांचे काही कवितासंग्रह आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत, हे फार कमी जणांना ठावूक आहे. तर आजच्या दिवशी आपण जाणून घेऊयात मोदींच्या जगासमोर फारशा न आलेल्या या पैलूविषयी.

गतवर्षी 2018 च्या बोर्डाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. त्यामध्ये परीक्षेचा तणाव दूर कसा करावा, याचा सल्ला देण्यात आला होता. मोदींनी आपल्या बालपणीच्या काही गोष्टी सांगून तणावामधून बाहेर कसे पडायचे याचा सल्ला विद्यार्थ्यांना या पुस्तकामधून दिला होता.

साक्षी भाव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा संग्रह आहे. 2015 मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता.

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना नरेंद्र मोदी यांनी एकूण 67 कविता रचल्या होत्या. त्या कवितांचा या कवितासंग्रहात समावेश आहे.

कन्विएंट अॅक्शन या पुस्तकाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी जागतिक वातावरणातील बदलांवर भाष्य केले आहे.

ज्योति पुंज या पुस्तकाच्या माध्यमातून परोपकार आणि सेवेचे महत्त्व विषद केले आहे.

या पुस्तकामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज आणि सामाजिक समरसतेचे महत्त्व सांगितले आहे.

द 37 सिंगापूर लेक्चर हे मोदींचे पुस्तकसुद्धा प्रकाशित झाले आहे.