Narendra modi left social media then Memes rain on Twitter, netizens say 'cause' MMG
सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, मोदींच्या ट्विटनंतर नेटीझन्स भाऊक By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 09:53 AM2020-03-03T09:53:19+5:302020-03-03T16:28:25+5:30Join usJoin usNext सध्या मोदींचा सोशल मीडियाला रामराम करण्याच्या निर्णयावर मोठ्या प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजमाध्यमांना सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी (3 मार्च) अचानक जाहीर केला. मोदींच्या या निर्णयानंतर देशवासियांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेले नाही. मात्र, नेटीझन्सने अंदाज बांधत मोदींचा या निर्णयामागचं कारण सांगितलंय. मिम्समधून नेटीझन्सने मोदींच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी याप्रकारचं ट्विट केल्यानंतर अनेक शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी ट्रेंड पण सुरु करण्यात आला आहे. जवळपास ५० हजारांहून जास्त लोकांनी मोदींच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा निर्णय का घेतला. पण या उत्तरासाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण स्वत: नरेंद्र मोदीच याचं उत्तर देतील. सोशल मीडियावर काही शक्यता वर्तवली जात आहे. स्वदेशी सोशल मीडिया येणार ? सध्या परीक्षेचे दिवस सुरु असल्याने विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी असं सांगितले असावे अशीही चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या ट्विटनंतर ही शक्यता वर्तवली जात आहे. नरेंद्र मोदींनी नेहमी मेक इन इंडियाला प्रोत्साहन दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी मोदी व्यथित आहेत. २६ फेब्रुवारीला त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात 'नो सर' ट्रेन्ड करायला लागलं. मंगळवारी सकाळीही हा टॉप ट्रेन्ड होता. मोदींच्या ट्विटनंतर संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी समर्थन केलंय, तर बहुसंख्य नागरिकांना आणि फॉलोवर्संनी न सोडण्याचं आवाहनं केलंय मोदी आता टीकटॉकवर येणार आहेत असं म्हणत अनेकांनी मिम्स बनवलेत. तर काहींनी नका सोडू मी 4-5 वेळा ट्राय केलाय असंही म्हटलंय टॅग्स :नरेंद्र मोदीमिम्सट्विटरसोशल मीडियाNarendra ModimemesTwitterSocial Media