Narendra Modi: नरेंद्र मोदींकडे नाही एकही वाहन, संपत्तीत वर्षभरात एवढी वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 01:16 PM 2021-09-25T13:16:38+5:30 2021-09-25T13:25:40+5:30
नरेंद्र मोदी हे केवळ राजकीय नेते आहेत, ते उद्योजक नाहीत किंवा त्यांच्या नावावर कुठली कंपनीही नाही. त्यामुळे, त्यांच्या वार्षिक उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची उलाढाल नक्कीच होत नाही. देशाचे पंतप्रधान असलेल्या व्यक्तीच्या संपत्तीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता बहुतांश नागरिकांना असतेच. त्यामुळे, मोदींच्याही संपत्तीत वर्षभरात किती रुपयांची वाढ झाली, हे ऐकायला किंवा वाचायला सर्वांनाच आवडते.
नरेंद्र मोदी हे केवळ राजकीय नेते आहेत, ते उद्योजक नाहीत किंवा त्यांच्या नावावर कुठली कंपनीही नाही. त्यामुळे, त्यांच्या वार्षिक उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची उलाढाल नक्कीच होत नाही.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांचा सर्व खर्च हा शासकीय रकमेतूनच होत असतो. त्यामुळे, त्यांना मिळणारी पगार ही बचत खात्यात जमा होते.
मोदींकडून आपल्या संपत्तीविषयक आणि वर्षभराती आर्थिक कमाईबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, मोदींच्या एकूण संपत्तीत यंदा 22 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती 3.07 कोटी रुपये आहे. गतवर्षी ही रक्कम 2.85 कोटी रुपये एवढी होती. म्हणजेच या वर्षी मोदींच्या संपत्तीत 22 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
मोदींची शेअर मार्केटमध्ये कुठेही गुंतवणूक नसून केवळ जीवन बीमा पॉलिसी 1.5 लाख रुपयांची आहे. तर, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 8.9 लाख रुपयांचं आहे.
एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड 20 हजार रुपये असून 2012 मध्ये तो खरेदी करण्यात आला होता. मोदींजवळ कुठलेही वाहन नाही. तर, केवळ 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत.
31 मार्च 2021 रोजी त्यांचा बँक बॅलन्स 1.5 लाख रुपये एवढाच होता. तर, हातात रोख रक्कम केवळ 36 हजार रुपये होती. गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम कमीच होती. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून मोदींनी कुठेही संपत्ती खरेदी केली नाही.