नरेंद्र मोदी यांनी दाखविला 'हमसफर एक्स्प्रेस 'ला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 22:29 IST2018-02-19T22:26:03+5:302018-02-19T22:29:32+5:30

कर्नाटक : म्हैसूरहून राजस्थानमधील उदयपूरला जाणा-या पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.

पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेस मांड्या, बंगळुरु, दवानगेरे, हुबळी, बेळगाव, पुणे, कल्याण, सूरत, बडोदा, रतलाम, चितौरगड या स्टेशनवरुन जाणार आहे.

सोमवारी दुपारी 3.30 वाजता म्हैसूरहून रवाना झाल्यानंतर बुधवारी सकाळी 11.30 वाजता उदयपूर पोहोचणार आहे.

ही एक्स्प्रेस 16 डब्यांची असून सर्व 3 टियर एसी असणार आहेत.

कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेस जाणार आहे.