Narendra Modi took Advani's feet and wished him a happy birthday
अडवाणींचे पाय धरुन मोदींनी घेतले आशीर्वाद, बर्थ डेच्या दिल्या शुभेच्छा By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 03:30 PM2020-11-08T15:30:23+5:302020-11-08T18:36:18+5:30Join usJoin usNext भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा आज 93 वा वाढदिवस साजरा होत आहेृ. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय गुरू राहिलेल्या अडवाणींच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी घरी जाऊन त्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडवाणींच्या घरी जाऊन केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा केला, तसेच अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी रविवारी सकाळी ट्वीटही केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही घरी जाऊन अडवाणींना शुभेच्छा दिल्या. लालकृष्ण अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, “भाजपाला जनमानसापर्यंत पोहोचवण्यासोबतच देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पक्षाच्या कोट्यावधी सदस्यांसह ते देशवासियांचे प्रत्यक्ष प्रेरणास्रोत आहेत. मी त्यांच्या दीर्घायुष्याची आणि आरोग्याची प्रार्थना करतो.” त्यानंतर, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या पायांना स्पर्श करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. यानंतर घराच्या लॉनवर पंतप्रधान मोदींनी अडवाणींसोबत केक कापला. त्यांनी अडवाणींना केक भरवला. यावेळी त्यांच्यात दीर्घ चर्चाही झाली. इथे अडवाणींच्या कन्या प्रतिभा अडवाणीही उपस्थित होत्या. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच मोदी आणि अडवाणी यांची भेट झाली आहे. त्यामुळे, मोदींच्या भेटीने अडवाणी यांनाही आनंद झाला. मोदींनी पाय धरून अडवाणींचे दर्शन घेतले, त्यानंतर सोबतच नाष्टाही केला. अडवाणी यांनी सोशल मीडियातूनही मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात येत आहेत. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून अडवाणींच्या आठवणींनाही उजाळा देण्यात येत आहे. टॅग्स :लालकृष्ण अडवाणीनरेंद्र मोदीपंतप्रधानLal Krishna AdvaniNarendra Modiprime minister