National War Memorial ...!
राष्ट्रीय युद्ध स्मारक...! By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 04:49 PM2019-02-26T16:49:29+5:302019-02-26T19:00:51+5:30Join usJoin usNext देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्धाटन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत 1968 मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात 2015 मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली. राष्ट्रीय युद्ध स्मारकाऐवजी याठिकाणी एक संग्रहालयही बांधण्यात आले आहे. या ठिकाणी भिंतीवर 25 हजार 942 शहीदांची नावे लिहिण्यात आली आहेत. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या भिंतीवर युद्धाशी संबंधित कलाकृती लावण्यात आल्या आहेत. यात सियाचिनसह कारगिल युद्धादरम्यान टायगर हिल ताब्यात घेतलेली क्षणचित्रे आहेत. पहिल्या महायुद्धात भारताच्या 84 हजार शहीद जवानांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी इंडिया गेट उभारले होते. त्यानंतर 1971 च्या युद्धातील 3 हजार 843 शहीद जवांनांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती स्मारक बांधण्यात आले होते. राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे एक मोबाईल अॅपही लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये शहीदांचे नाव टाईप करुन त्यांचे स्मारक कुठे आहे याची माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यासाठी 176 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. टॅग्स :भारतीय जवानIndian Army