Navjot Simi IPS: मॉडेल, अभिनेत्री नाही तर आयपीएस ऑफिसर आहे ही तरुणी, लुक्स आणि स्टाईलची होते चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:30 PM2022-08-25T19:30:49+5:302022-08-25T19:40:44+5:30

Navjot Simi IPS: आयएस किंवा आयपीएस अधिकारी बनणे हे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते आपापल्या परीने मेहनतही करतात. दरम्यान, अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यापैकीच एक आहे नवज्योत सिमी.

आयएस किंवा आयपीएस अधिकारी बनणे हे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी ते आपापल्या परीने मेहनतही करतात. दरम्यान, अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यापैकीच एक आहे नवज्योत सिमी.

नवज्योत सिमी ह्या पंजाबमधील राहणाऱ्या आहेत. त्यांचा जन्म पंजाबमधील गुरदासपूर येथे २१ डिसेंबर १९८७ मध्ये झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण पंजाबमधील पाखोवाल पंजाब मॉडल पब्लिक स्कूलमध्ये झालं होतं.

आयपीएस अधिकारी बनण्यापूर्वी नवज्योत सिमी डॉक्टर बनल्या होत्या. जुलै २०१० मध्ये सिमी यांनी लुधियाना येथील बाबा जसवंत डेंटल कॉलेज येथून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीची पदवी मिळवली होती.

नवजोत सिमी यांनी लहानपणापासून आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. डॉक्टर बनल्यानंतही त्या हे स्वप्न विसरल्या नाहीत. त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेसाठी दिल्लीमध्ये येऊन तयारी सुरू केली. २०१६ मध्ये त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र त्या मुलाखतीमध्ये पुढे जाऊ शकल्या नाहीत.

पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर त्यांनी हार मानली नाही. पुढच्याच वर्षी २०१७ मध्ये ७३५ वी रँक मिळवून त्या आयपीएस अधिकारी बनल्या.

नवज्योत सिमी यांचा लुक कुठल्याही मॉडेलपेक्षा कमी नाही आहे. कामाशिवाय लुकसाठीही त्या खूप चर्चेत असतात. तसेच त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे इन्स्टाग्रामवर १२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नवजोत सिमी यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हॅलेंटाइन डे दिवशी आयएएस अधिकारी तुषार सिंगला यांच्याशी विवाह केला होता. तुषास सिंगला २०१५ चे पश्चिम बंगाल कॅडरचे आयएस आहेत.

व्हॅलेंटाइन डे दिवशी नवज्योत सिमी पाटणा येथून हावडा येथे पोहोचल्या आणि त्यांनी तुषार सिंगला यांच्या ऑफिसजवळच काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह केला होता.