Naxal Attack: दहशतवाद्यांपेक्षा क्रूर आणि भयानक, नक्षली हल्ल्यांची दोन दशकातील हादरवणारी आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 12:21 PM 2023-04-27T12:21:10+5:30 2023-04-27T12:31:22+5:30
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्याने छत्तीसगड पुन्हा हादरलं आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटामध्ये १० जवानांना वीरमरण आलं, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. सरकार कुणाचंही असो, गेल्या दोन दशकांमध्ये दहशतवाद्यांनी वेळोवेळी आपल्या क्रौर्याचा प्रत्यय दिला आहे. नक्षलवाद्यांच्या क्रूर हल्ल्याने छत्तीसगड पुन्हा हादरलं आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटामध्ये १० जवानांना वीरमरण आलं, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. सरकार कुणाचंही असो, गेल्या दोन दशकांमध्ये दहशतवाद्यांनी वेळोवेळी आपल्या क्रौर्याचा प्रत्यय दिला आहे.
गेल्या दीड दशकामध्ये नक्षलवाद्यांनी २४ मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये सुरक्षा दलांचे शेकडो जवान आणि अधिकारी हुतात्मा झाले आहेत. तसेच शेकडो नागरिकांचाही मृत्यू झाल आहे. त्यातील काही मोठ्या कारवायांची यादी पुढीलप्रमाणे.
२८ फेब्रुवारी २००६ नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील एर्राबोर गावात भूसुरुंगस्फोट घडवून आणला. त्यात २५ जवानांचा मृत्यू झाला.
१६ मे २००६ दंतेवाडा येथील शिबिरावर नक्षलवाद्यांनी हल्ला करून अनेक ग्रामस्थांचे अपहरण केले. त्यातील २९ नागरिकांची हत्या करण्यात आली.
१५ मार्च २००७ बस्तरमधील पोलीस बेस कॅम्पवर ३५० नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ जवानांना हौतात्म्य आले.
६ एप्रिल २०१० दंतेवाडा येथील ताडमेटला येथे नक्षलवाद्यांनी एका पाठोपाठ एक असे स्फोट घडवले. त्यात निमलष्करी दलाच्या ७५ जवानांसह ७६ जणांचा मृत्यू झाला.
२५ मे २०१३ दरभा येथील झीरम घाटीमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला. यात विद्याचरण शुक्ल, महेंद्र कर्मा, नंदकुमार पटेल या काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह २५ जणांचा मृत्यू झाला होता.
८ मे २०१३ नक्षलवाद्यांनी पोलसांचे वाहन स्फोटाद्वारे उडवले. यात ८ जवानांना वीरमरण आलं.
२८ फेब्रुवारी २०१४ झीरम घाटी येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ जवान आणि ४ पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आले
१ मार्च २०१७ नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ कमांडोंना वीरमरण आलं.
२२ मार्च २०२० सुकमा जिल्ह्यातील कोराजडोंगरी येथील चिंता गुफा जवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवानांना वीरमरण आलंय
२३ मार्च २०२१ नारायणपूरमध्ये ७५ जवानांनी भरलेली बस नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट करून उडवली. यात ५ जवानांना हौतात्म आलं.