New Indian Parliament Building Confluence of Ancient and Modern; How is the new parliament?
भारतीय संसदेच्या नव्या वास्तूत प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम; कशी आहे नवी संसद? By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 08:07 AM2023-09-19T08:07:22+5:302023-09-19T08:11:23+5:30Join usJoin usNext पर्यावरणस्नेही : हरित बांधकामतंत्राचा वापर करून बांधण्यात आलेल्या या इमारतीत जुन्या इमारतीच्या तुलनेत विजेचा वापर ३० टक्क्यांनी कमी होणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर रिसायकलिंगचाही वापर केला जाणार आहे. भूकंपारोधक : दिल्लीचा समावेश भूकंपाच्या झोन-पाचमध्ये असल्याने ही इमारत भूकंपापासून सुरक्षित राहील, अशा पद्धतीने उभारण्यात आली आहे. ही इमारत पुढील १५० वर्षांसाठी कार्य करेल. विविध दालने : खासदारांसाठी इमारतीत लाउंज, डायनिंग हॉल आणि ग्रंथालयाची सुविधा दिली आहे. विविध समित्यांसाठी ६ दालने आहेत. त्याचबरोबर मंत्रिपरिषदेच्या कार्यालयांसाठी ९२ दालने आहेत. देशभरातून बांधकाम साहित्य : इमारतीच्या बांधकामासाठी देशभरातून साहित्य आणले गेले. त्यात ढोलपूरच्या सर्मथुरा येथील विशिष्ट प्रकारचा दगड आणि राजस्थानमधील जैसलमेरमधील लाखा गावातील ग्रॅनाइटचा समावेश आहे. सजावटीसाठी वापरण्यात आलेले लाकूड नागपूरचे असून, मुंबईतील कारागिरांनी लाकडी वस्तू तयार केल्या आहेत. उत्तर प्रदेशाच्या भदोही विणकारांनी पारंपरिक पद्धतीने कार्पेट बनवले आहे. गांधी पुतळा : नव्या आणि जुन्या इमारतीच्या दरम्यान असलेल्या लॉनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींचा १६ फूट उंचीचा कांस्य पुतळा आहे. हा पुतळा विविध आंदोलनांचा साक्षीदार आहे. १९९३ मध्ये संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेला हा पुतळा बांधकामादरम्यान हलवण्यात आला होता. पद्मभूषण पुरस्कारविजेते शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केला होता. राष्ट्रीय चिन्हे : इमारतीत विविध राष्ट्रीय चिन्हे लावण्यात आली असून ९,५०० किलो आणि ६.५ मीटर उंचीचे अशोक स्तंभाचे लावले आहे आणि ते दूरवरून दिसते. या भव्य कांस्य शिल्पाला आधार देण्यासाठी ६,५०० किलोग्रॅमची रचना उभारली असून प्रवेशद्वारावर अशोक चक्र आणि ‘सत्यमेव जयते’ हे शब्द कोरलेले आहेत. बांधकाम खर्च : १,२०० कोटी रुपये. त्यात सांस्कृतिक मंत्रालयाने खरेदी केलेल्या कलाकृतींच्या २०० कोटी रुपयांचा समावेश आहे. सोनेरी राजदंड : पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरित करण्यासाठी दिलेला सुवर्ण राजदंड, नव्या लोकसभेच्या सभागृहात सभापतींच्या व्यासपीठाजवळ ठेवण्यात आला आहे. डिजिटायझेशन : नव्या संसदेत सभागृहाचे कामकाज, प्रश्न आणि इतर कार्यवाही डिजिटल पद्धतीने केली जात आहे. याशिवाय टॅब्लेट आणि आयपॅडचा वापरही सर्वसामान्य होईल. प्रदर्शन गॅलरी : 'शिल्प' गॅलरीमध्ये भारतातील सर्व राज्यांतील मातींपासून बनवलेल्या विविध वस्तूंसह संपूर्ण भारतातील वस्त्रे प्रतिष्ठापनांचे प्रदर्शन असेल. 'स्थापत्य' गॅलरीमध्ये विविध राज्यांतील प्रतिष्ठित स्मारके प्रदर्शित केली जातील. तसेच योगासनांचीही माहिती असेल. वास्तुशास्त्र : इमारतीच्या सर्व प्रवेशद्वारांवर, भारतीय संस्कृती आणि वास्तुशास्त्रानुसार संरक्षक पुतळे म्हणून विविध प्राणी प्रदर्शित केले जातील, त्यात हत्ती, घोडा, गरुड, हंस तसेच शार्दूल आणि मकर या पौराणिक प्राण्यांचा समावेश होतो. कामगारांचे प्रतिबिंब : संसदेच्या बांधकामासाठी सुमारे ६०,००० कामगारांचे योगदान राहिले असून, त्याचे प्रतिबिंब नव्या इमारतीत दिसते.टॅग्स :संसदParliament