new parliament building ready for inauguration seating arrangement for 1280 mp exclusive photos
नवीन संसद भवनाचे फोटो आले समोर, पाहा लोकशाहीचे नवे मंदिर किती भव्य आहे? By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:15 PM2023-05-26T23:15:30+5:302023-05-26T23:22:39+5:30Join usJoin usNext new parliament building : नवीन संसद अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन होणार आहे. मात्र, नवीन संसद कशी असेल, याबाबतचा प्रश्न देशवासियांच्या मनात निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत नवीन संसदेतील फोटो समोर आले आहेत. नवीन संसद अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. सभागृहातील प्रत्येक खासदाराच्या आसनासमोर मल्टीमीडिया डिस्प्ले लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच, संसदेची रचना त्रिकोणी आकारात करण्यात आली आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. नवीन संसद दिसायला सुंदर तर आहेच, पण सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप मजबूत आहे. नवीन संसद भवनामध्ये 1272 सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, म्हणजेच लोकसभेच्या 888 जागा आणि राज्यसभेच्या 384 जागा आहेत. तर जुन्या संसदेत लोकसभेच्या केवळ 550 आणि राज्यसभेच्या 250 जागा होत्या. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प 2019 मध्ये सुरू झाला. या अंतर्गत एक नवीन संसद भवन बांधली, जी 65400 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामावर जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संसद भवनात लोकसभेची थीम राष्ट्रीय पक्षी मोरावर तर राज्यसभेची थीम राष्ट्रीय फूल कमळावर आहे. तसेच, संसद भवनाच्या तीन दरवाजांना ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार असे नाव देण्यात आले आहे. नवीन संसद भवनातील लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या विविधतेचे प्रतीक असलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या खिडक्या असणार आहेत. नव्या संसदेत सर्व खासदारांना लिहिण्यासाठी एक डेस्क असणार आहे. आतापर्यंत ही व्यवस्था फक्त पुढच्या रांगेत बसणाऱ्या खासदारांसाठी होती. टॅग्स :संसदनरेंद्र मोदीParliamentNarendra Modi