New parliament house pm narendra modi foundation big points what is different
८३ लाखांना बनवलं होतं संसद भवन; आता नव्यासाठी ९७१ कोटी लागणार; जाणून घ्या १० खास गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:56 PM2020-12-10T14:56:25+5:302020-12-10T15:44:17+5:30Join usJoin usNext नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. हे बांधकाम २०२२ साली पूर्ण होईल, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी सांगितले. नवीन बिल्डींगमध्ये अधुनिक तंत्रज्ञान, नवीन गरजांसंबंधी गोष्टी लक्षात घेतल्या जात आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये नवीन सांसद भवनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्ताावानुसार नवे संसद भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. संसद भवन २०२४ पर्यंत तयार होऊ शकते. नवीन बिल्डिंगचे डिजाईन HCP च्या अहमदाबात डिजाईन मॅनेजमेंटने केले आहे. हे संसद भवन निर्माण टाटा प्रोजेक्ट्सद्वारे तयार करण्यात आले आहे. नवीन बिल्डींगमध्ये ऑडियो विजुअल सिस्टम, डाटा नेटवर्क फॅसिलिटीवर लक्ष दिले जाणार आहे.नवीन इमारतीत १२२४ खासदारांची बसण्याची क्षमता असेल. त्यापैकी ८८८ लोकसभेमध्ये बसू शकतील, तर राज्यसभेमध्ये ३८४ खासदारांची बसण्याची क्षमता असेल. लोकसभा आणि राज्यसभा सभागृहांशिवाय नवीन इमारतीत भव्य संविधान कक्ष असेल. ज्यामध्ये भारताचा लोकशाही वारसा दाखवण्यासाठी इतर वस्तूंबरोबरच घटनेची मूळ प्रत, डिजिटल प्रदर्शन इ. वस्तू असतील. विद्यमान संसद भवन ब्रिटीशांनी बांधली होती. त्याचा पाया १२ फेब्रुवारी १९२१ रोजी घालण्यात आला होता. जगातील सर्वात म्हणून पाहिले जाणारे सर एडवर्ड लुटियन्स, सर हॉर्बर्ट बेकर यांच्या नेतृत्वात संसद भवनची इमारत बांधली गेली. त्यानंतर ही इमारत तयार करण्यासाठी एकूण ८३ लाख रुपये खर्च झाले. केंद्र सरकारच्या योजनेनुसार सेंट्रल व्हिस्टा ही नवीन संसदेची इमारत बांधली जात आहे. संसद भवनाशिवाय पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन आणि आसपासच्या भागांचे नूतनीकरण केले जाईल.टॅग्स :संसदभारतनरेंद्र मोदीParliamentIndiaNarendra Modi