New satellite pics reignite Chinese 'spy base' suspicion at Myanmar's Coco Islands
रनवे, हँगर अन् सर्व्हिलांस कॅमेरे...! समुद्रातील 'या' बेटावर सीक्रेट चीनचा सीक्रेट अड्डा, भारतासाठी वाढली चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 11:13 AM2023-04-02T11:13:57+5:302023-04-02T11:20:46+5:30Join usJoin usNext १९५० च्या दशकाच्या अखेरीस जनरल ने विन यांनी बनवलेल्या कोको बेटावर काही बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे हेरगिरीसाठी किंवा विशेष पाळत ठेवण्यासाठी केली जात आहेत की काय अशी शंका निर्माण होत आहे. कोको बेटांवर म्यानमारचे नियंत्रण आहे. या वर्षी जानेवारीमध्ये, मॅक्सर टेक्नॉलॉजीजने घेतलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये ग्रेट कोको बेट परिसरात नवीन इमारतींचे बांधकाम उघड झाले. येथे दोन नवीन बांधलेले हँगर्स त्याच्या मध्यभागी दिसतात आणि यासह उत्तरेकडे काही नवीन इमारती देखील दिसत आहेत. नौदलाच्या कारवायांना चालना देण्यासाठी मोठा तळही तयार केला असण्याची शक्यता आहे. २३०० मीटर लांबीची धावपट्टीही फोटोत दिसत आहे, जी दशकापूर्वी केवळ १३०० मीटर होती. या संपूर्ण प्रकरणाकडे चथम हाऊसने सर्वप्रथम लक्ष वेधले आहे. चॅथम हाऊस ही थिंक टँक आहे ज्याचे लंडनमध्ये मुख्यालय आहे. म्यानमारच्या बांधकामात चीनचाही सहभाग? - म्यानमार जंटा बेटावर गुप्तपणे समुद्री पाळत ठेवण्याच्या ऑपरेशन्स अंतर्गत अशी तयारी करत आहे याचीही शक्यता आहे. यात चीन अनेकदा सहभागी झाला आहे. अशा स्थितीत या प्रकारात चीनचा कुठेतरी हात आहे की काय, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. सत्तांतरानंतर चीन कम्युनिस्ट पार्टीचं जंटा बेटावरील निर्भरतेमुळे हा संशय आणखी बळावतो. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, म्यानमारच्या घनदाट लोकसंख्येच्या शहरात चीन संस्थेचे सर्व्हिलांस कॅमेरे लावले होते. बघता-बघता २०० इमारती उभ्या राहिल्या कोको बेटावर यापद्धतीने गुप्त हजेरीने पीपुल्स लिबरेशन आर्मीला मजबूत बळ मिळू शकते. ते मलक्का जलडमरुमध्यऐवजी हिंद महासागरापर्यंत सहजपणे पोहचण्यासाठी पर्यायी रस्ते मजबूत करत आहेत. आता चीन मलक्का जलडमरुमध्यवर निर्भर आहे. त्यामुळे चीन-म्यानमार इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून देशात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू होत आहेत. एक थ्री-डाइमेंशनलर व्ह्यू पाहता, येथे २०० इमारतींच्या बांधकाम केल्याचं स्पष्ट होते. ज्यात म्यानमारचे लष्करी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब या बेटावर राहतात. बेटावर चीनची अशी रणनीती आणि संशयास्पद उपस्थिती ही नवीन गोष्ट नाही. रिपोर्ट्सनुसार, २००९ साली भारताने म्यानमारसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीलाही चीन या बेटांचा लष्करी आणि नौदलाच्या उद्देशाने वापर करत असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसच्या २०१४ च्या पेपरमध्ये असे नमूद केले आहे की, चीनने किमान मनौंग, हिंगगी, झडेत्की अंदमान समुद्र आणि म्यानमारमधील कोको बेटांमध्ये SIGINT श्रवण केंद्रे बांधली आहेत. येथे चिनी तंत्रज्ञ आणि प्रशिक्षकांनी यांगून, मौलमेन आणि मेरगुईजवळ नौदल तळ आणि रडार-सुसज्ज नौदल तळ उभारण्यासाठी काम केले आहे. भारतीय तटरक्षक दलाने अंदमान बेटांवर म्यानमारचा झेंडा फडकवत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरला रोखले. तपासणी केल्यावर, ते सर्व चिनी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले, ज्यांच्याकडून क्रूचे रेडिओ आणि डेप्थ साउंडर सापडले, जे पाणबुड्यांमध्ये वापरले जातात. चीनने गुप्तहेर तळ बनवणे ही चिंतेची बाब - अंदमान आणि निकोबार कमांड ही भारतातील एकमेव कमांड आहे जी केवळ नौदल, हवाई दल आणि लष्करासोबत एकत्र काम करते. या प्रदेशातून अनेक व्यापारी वाहिन्या जात असल्याने भारतासाठी या प्रदेशाचे धोरणात्मक महत्त्व आहे. या प्रदेशात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपानंतर भारत आपली सागरी आणि निगराणी क्षमता मजबूत करण्याचा विचार करत आहे. दक्षिणपूर्व आशियातील भारताच्या धोरणात्मक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी २००१ मध्ये युनिफाइड कमांडची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे या प्रदेशात अधिक लष्करी शक्ती तैनात करण्यात आली. अलिकडच्या वर्षांत, चीन हिंद महासागर प्रदेश (IOR) मध्ये आपल्या नौदल ऑपरेशन्सचा विस्तार करत आहे, अनेकदा त्याच्या पाणबुडीच्या हालचाली चाचेगिरीविरोधी ऑपरेशन्स करत आहे. येथून जवळच गुप्तचर तळ बांधून चीन या ऑपरेशनवर बारकाईने नजर ठेवू शकतो आणि ही चिंतेची बाब आहे. येथून, ओडिशाच्या किनारी प्रदेशाजवळील श्रीहरिकोटा येथे ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आणि DRDO (संरक्षण संशोधन आणि लष्करी संघटना) देखील संभाव्य निरीक्षण केले जाऊ शकते आणि ही चिंतेची बाब आहे.टॅग्स :चीनchina