दोस्त दोस्त ना रहा! पाठीत वार केला; मोदींनी जिनपिंगना वाढदिवसाच्या शुभेच्छा नाकारल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:36 PM2020-06-18T14:36:20+5:302020-06-18T14:43:51+5:30

India China Face Off: पंतप्रधान मोदींनी जिनपिंगना वाढदिवसाच्या शुभेच्छा न देणे हे एक कुटनितीचा भाग मानला जात आहे. डोकलाम वाद सुरु असतानाही मोदींनी जिनपिंगना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

लडाखमध्ये सोमवारी चीनी सैन्याने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. काटेरी लाठ्या, अनुकुचीदार दगडांनी पाठीमागून वार केला. मात्र, भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्यूत्तरात चीनचे 40 च्या आसपास सैनिक ठार झाले आहेत. तर 20 भारतीय जवान शहीद झाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली आहे. यंदा मोदींनी जिनपिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळले आहे.

भारत चीन सीमेवर 1962, 1975 नंतर मोठे तणावाचे वातावरण आहे. गेल्या दीड महिन्यापासून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. मात्र, काही प्रमाणात चर्चेद्वारे चीनी सैन्याला मागे पाठविण्यात यश आले होते.

सोमवारी मागे हटण्याचा शब्द देत चीनी सैन्याने जिवघेणा हल्ला केला. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. यामुळे दोन्ही सैन्यांदरम्यान तणावाचे वातावरण आहे.

पंतप्रधान मोदींनी जिनपिंगना वाढदिवसाच्या शुभेच्छा न देणे हे एक कुटनितीचा भाग मानला जात आहे. डोकलाम वाद सुरु असतानाही मोदींनी जिनपिंगना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

लडाखमध्ये गलवान भागात भारत-चीन वाद सुरु होता. गेल्या सव्वा महिन्यापासून चीनचे सैन्य़ भारतीय जमिनीवर तळ ठोकून होते. मागे हटत नव्हते. युद्धसामुग्रीचीही जमवाजमव सुरु केली होती. सैन्याची कुमक वाढविण्यात येत होती.

15 जूनच्या रात्री भारतीय जवानांवर चीनने हल्ला केला. त्याच दिवशी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा वाढदिवस होता. मात्र, मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या नव्हत्या. भारतीय जवानांवर दुपारी 4 वाजता हल्ला सुरु झाला.

गेल्या काही वर्षांपासून मोदी यांनी जिनपिंग यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा संदेश पाठविलेले आहेत. यावेळी चीन भारताविरोधात काही ना काही कुरापती करत होता.

2016 मध्ये मोदी यांनी जिनपिंग यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळीही दोन्ही देशांमध्ये तणाव होता. कारण एनएसजीमध्ये भारताला सहभागी करण्यास चीनने विरोध केला होता.

मोदींना 2017 मध्येही जिनपिंग यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा तर डोकलाम वाद सुरु होता. हा वाद 73 दिवस चालला होता. डोकलामध्ये रस्ते बनविण्य़ावरून दोन्ही देशांमध्ये तणाव झाला होता.

गेल्या वर्षी तर मोदी यांनी बिश्केकच्या परिषदेमध्येच व्यक्तीगत भेटीवेळी जिनपिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. किर्गिस्तानमध्ये ही परिषद आयोजित करण्य़ात आली होती.

मात्र यंदा मोदी यांनी जिनपिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. तसे मोदी कोणत्याही नेत्याला सकाळीच शुभेच्छा देतात. तसेच हल्ल्याला दुपारीच सुरुवात झाली होती. यावरून चीनसोबतचा तणाव किती वाढलेला होता याची कल्पना येते.

Read in English