उत्तर भारत थंडीने गारठला, दवबिंदूंचा झालाय बर्फ By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 02:02 PM 2021-12-20T14:02:42+5:30 2021-12-20T14:22:17+5:30
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला असून राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातही तापमान 3 ते 4 अंश सेल्सियसमध्ये गेले आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा लाट आल्याचं दिसून येत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला असून राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातही तापमान 3 ते 4 अंश सेल्सियसमध्ये गेले आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा लाट आल्याचं दिसून येत आहे.
पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही भागांतही तापमान खालावले असून पाण्याचा बर्फ होत असल्याचं चित्र दिसून आलं. दिल्लीच्या लोधी रोडवर तापमान 3.4 डिग्री सेल्सीयसमध्ये रेकॉर्ड करण्यात आलंय.
राजस्थानच्या फतेहपूर येथे 3.3 डिग्री सेल्सीयस तामपानाची नोंद झाली आहे. तर, चारू येथेही थंडीने प्रदेश गारठला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
राजस्थानच्या चारू, रेवरी, अदमपूर आणि हनुमानगड येथील वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा असून शेतातील दवबिंदूंचा बर्फ झाल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर संबंधित परसिरातील थंडीचे फोटो व्हायरल झाले आहेत. राजस्थानच्या फतेहपूर आणि सिकर जिल्ह्यात तापमान 5.2 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे.
झाडांवर, पानांवर आणि शेतातही कडाक्याच्या थंडीचा परिमाण दिसून येत आहे. शेतातील दव बर्फाळ झाल्याचं चित्र अनेकठिकाणी आहे
राजधानी दिल्लीत पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुके दिसून येत आहे, तर थंडीमुळे बाहेर गर्दीही कमी झाल्याचे चित्र आहे