CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! डेल्टाहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येऊ शकतो समोर?; तज्ज्ञ म्हणतात... By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:07 AM 2021-08-09T10:07:23+5:30 2021-08-09T10:21:14+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटनी चिंता वाढवली आहे. व्हायरसच्या रुपात सातत्याने बदल होत असलेले पाहायला मिळत आहेत. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 20 कोटींवर पोहोचली आहे. तर 42 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. मात्र याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटनी चिंता वाढवली आहे. व्हायरसच्या रुपात सातत्याने बदल होत असलेले पाहायला मिळत आहेत.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेला डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. पण डेल्टाहूनही अधिक जीवघेणा व्हायरस येऊ शकतो का? याबाबत तज्ज्ञ सध्या संशोधन करत आहेत.
या व्हेरिएंटबाबत अद्याप पूर्णपणे संशोधन झालेलं नाही. पण हा व्हायरस सध्या जगातील 135 देशांमध्ये पसरला असून जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतर व्हेरिएंच्या तुलनेत सर्वाधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णामध्ये याची लक्षणं कमी वेळात दिसून येत आहेत. तसेच डेल्टा व्हेरिएंटमुळे अन्य आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले नागरिकदेखील डेल्टा व्हेरिएंटच्या विळख्यात सापडत आहेत. हा व्हायरस लसीकरणामुळे मानवी शरिरात तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला सहजपण चकमा देऊ शकतो.
चीनी संशोधकाच्या मते डेल्टा व्हायरस हा कोरोना व्हायरसच्या मुळ रुपाच्या तुलनेत तब्बल 1260 पट अधिक संसर्गजन्य आहे. काही अमेरिकन संशोधकांच्या मते, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाची लागण झाली आहे.
लस न घेतलेल्या नागरिकांमध्ये जितका व्हायरल लोड आहे, तितकाच 'व्हायरल लोड' लस घेतलेल्या नागरिकांमध्ये आढळला. यावर अद्याप संशोधन पूर्ण झालं नाही. शास्त्रज्ञांच्या मते, डेल्टा व्हेरिएंटमध्येही बदल होणं शक्य आहे. कारण डेल्टा प्लस हा व्हेरिएंटदेखील डेल्टापासून तयार झाला आहे.
येत्या काळात डेल्हा व्हेरिएंटहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. व्यापक प्रमाणात लसीकरण केल्यानं मृत्यूदर कमी केला जाऊ शकतोस असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा सध्या संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या व्हेरिएंटची प्रत्यक्ष संसर्ग क्षमता जाणून घेण्यासाठी सतत रिसर्च सुरू आहे. याच दरम्यान चीनमध्ये (China) केलेल्या एका रिसर्चमध्ये नवी माहिती समोर आली आहे.
रिसर्चनुसार, सामान्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात 1000 पटीने अधिक व्हायरस असतात. तसेच कोरोनाचा मूळ वुहान व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य आणि धोकादायक आहे असं देखील म्हटलं आहे.
डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग झालेली व्यक्ती अधिक व्हायरस बाहेर टाकते, असं एका संशोधकाचे म्हणणं आहे. म्हणूनच हा व्हेरिएंट अधिक लोकांना संक्रमित करतो. तसेच हा अत्यंत वेगाने देखील पसरत आहे.
चीनचे गुआंगडोंग प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅड प्रिवेंशन डिपार्टमेंटचे संशोधक जिंग लू आणि सहकाऱ्यांनी 62 कोरोना बाधितांवर संशोधन केलं आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे.
अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि टेस्टिंग-ट्रेसिंगचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गजन्य संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
WHO ने म्हटलं होतं की, डेल्टा पॅटर्नशी संबंधित वाढीव प्रसारण क्षमतेमुळे प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि विशेषतः कमी लसीकरणाच्या संदर्भात आरोग्य पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव येईल.