नीरव मोदीच नव्हे, तर हे पाच जण घोटाळा करून झाले पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:05 IST2020-01-16T14:59:03+5:302020-01-16T15:05:16+5:30

हिरे व्यापारी असलेले नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 11 हजार 400 कोटी रुपयांचा चुना लावला अन् तो देशातून परागंदा झाला.
विजय माल्ल्या हा भारतातील एक मोठा उद्योगपती आहे. याचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्यानं 17 बँकांतून जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज घेतलं आणि कर्ज न फेडताच तो देशाबाहेर पळून गेला.
ललित मोदी हा आयपीएलचा चेअरमन आणि कमिश्नर होता. ललित मोदीला गैरवर्तणुकीसाठी बीसीसीआयनं निलंबितही केले होते. 2013ला त्याला दोषी ठरविण्यात आले होते. त्यानंतर तो देशातून पसार झाला.
दाऊद इब्राहिम हा कुख्यात गुंड आहे. भारतात घातपाती कारवाया करून तो विदेशात पळून गेला. डी कंपनीचा म्होरक्या असलेल्या दाऊदविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. भारत त्याला अटक करण्यासाठी अद्यापही प्रयत्नशील आहे.
1997मध्ये गुलशन कुमारची हत्या झाली होती. या हल्ल्याचा तपास केला असता गुलशन यांच्या हत्येत नदीम अख्तरचा हात असल्याचं उघड झालं होतं.