Now, get the Aadhaar card without documents, relief from UIDAI
खुशखबर ! आता, कागदपत्रांशिवाय मिळवा आधार कार्ड, UIDAI कडून दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:28 PM2020-07-09T13:28:19+5:302023-05-08T16:11:21+5:30Join usJoin usNext आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यावश्यक असे कागदपत्र आहे. भारतीय नागरिक असल्याचा पुरावाच म्हणजे आधार ओळखपत्र होय. कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी किंवा सरकारी कामकाजासाठी तुम्हाला आधार कार्ड वापरणे बंधनकारक आहे. आधारकार्ड बनविण्याची प्रक्रिया आता आणखी सुलभ झाली आहे. भारतीय विशेष ओळख प्राधीकरण म्हणजेच UIDAI ने नागरिकांना दिलासा दिला आहे. युआयडीएआयने आधार बनविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्तीला पूर्णविरामा दिला आहे. आधार कार्ड नसल्यामुळे अनेकदा आपली कामे अडकून पडतात. त्यामुळे अगोदर आधार कार्ड बनवून घ्यावे लागते. त्यासाटी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ओळखपत्र आणि रहिवासी पत्ता संदर्भातील कागदपत्रे देणे बंधनकारक आहे, आता या कागदपत्रांशिवाय तुम्हाला आधार कार्ड बनवता येणार आहे. आधार केंद्रावर उपस्थित असलेल्या इंट्रोड्युसरच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार ओळखपत्र बनवू शकता. इंट्रोड्युसर म्हणजे रजिस्टारने अधिकृतपणे नेमलेला व्यक्ती होय. ज्यांच्याजवळ Pol किंवा PoA नाही, अशांची ओळख पटवून त्यांना आधार कार्ड देण्याचं काम इंट्रोड्युसरद्वारे करण्यात येईल. मात्र, त्यासाठी इंट्रोड्युसरकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. अर्जदारासोबत इंट्रोड्युसरही आधार केंद्रावर उपस्थित असणेही बंधनकारक आहे, अर्जदाराची ओळख आणि पत्ता याची खात्री केल्यानंतर एनरॉलमेंट फॉर्मवर अर्जदाराची सही घ्यावी लागणार आहे. UIDAI च्या परिपत्रकानुसार इंट्रोड्युसर अर्जदाराच्या नावाने एक प्रमाणपत्र जारी करेल, ज्याची वैधता ही तीन महिन्यांची असणार आहे.टॅग्स :आधार कार्डAdhar Card