मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 02:44 PM 2021-05-20T14:44:12+5:30 2021-05-20T14:49:53+5:30
देशातील काही राज्यांनी ration card नसले, तरी मोफत धान्य देण्याची सुविधा सुरू केली आहे. पाहा डिटेल्स... नवी दिल्ली: देशभरात कोरोनाची परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. कोरोनाच्या संकटात गरिबांना अन्न-धान्याची अडचण उद्भवू नये, यासाठी केंद्र सरकारने मे आणि जूनमध्ये Ration Card धारकांना मोफत रेशन जाहीर केले.
यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनेही सामान्य नागिरकांना, गरिबांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून, आता Ration Card नसतानाही लोक मोफत अन्नधान्याचा लाभ घेऊ शकतात.
Ration Card नसतानाही राजधानीतील रेशन दुकानांतून नागरिक रेशन घेऊ शकतील. लवकरच ही योजना लागू केली जाणार असल्याची माहिती मुख्य सचिव महसूल रेणुका कुमार यांनी दिली.
Ration Card बनलेले नाहीत, त्यांची मोहीम राबवून कार्डे तयार केली जातील आणि त्वरित रेशन दिले जाईल, असे सांगितले जात आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे.
दिल्ली सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे ७२ लाख Ration Card धारकांना मे आणि जून महिन्यासाठी मोफत शिधा वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ५ किलो धान्य दिले जाते.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना Ration Card शिवाय मोफत धान्य मिळू शकते. यासाठी त्यांना जवळच्या रेशन सेंटरमध्ये जावे लागेल. आपल्याला तेथे आपले नाव नोंदवावे लागेल. ते पात्र आढळल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळेल, असे सांगितले जात आहे.
ज्यांच्याकडे Ration Card नसेल, ते नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करू शकतात. रेशन कार्ड तयार करण्यासाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतात.
आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर अर्ज केल्यास आपल्याला https://nfsa.gov.in/portal/apply_ration_card भेट द्यावी लागेल. येथे अर्ज अर्जासह आधार कार्ड, पॅनकार्ड, निवास प्रमाणपत्र, पासपोर्ट आकार फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी आपणास जोडावी लागेल.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयातून फॉर्म घेऊ शकता. कुटुंबातील प्रमुख आणि सर्व सदस्यांचे नाव फॉर्ममध्ये भरा. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांची एक प्रत ठेवा. तसेच प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल. जेव्हा आपले नाव रेशन कार्ड यादीमध्ये समाविष्ट होईल, तेव्हा आपण आपल्या जवळच्या नियंत्रणाद्वारे शिधापत्रिका घेऊ शकता.