सैन्य दिनानिमित्त अहमदनगरमधल्या के के रेंजमध्ये आर्मीचा युद्धसराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 13:43 IST2018-01-15T13:40:00+5:302018-01-15T13:43:10+5:30

सैन्य दिनानिमित्त आज अहमदनगरमधल्या के के रेंजमध्ये आर्मीचा युद्धसराव झाला.
यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या रणगाड्यामधून शत्रूचं लक्ष्य अचूक टिपण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. अर्जुन, भीष्म आणि अजय या रणगाड्यांनी या कवायतीत सहभाग घेतला.
भारतीय सेनेकडून दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात येतो.
15 जानेवारी 1949 रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्र हाती घेतली होती.
या ऐतिहासिक क्षणानिमित्त 15 जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. सैन्य दिनानिमित्त दिल्लीत आर्मी डे परेडचे आयोजन केले जाते.