Omicron Variant : चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 09:34 AM 2021-12-15T09:34:42+5:30 2021-12-15T09:54:35+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन व्हेरिएंट हा याआधी आलेल्या कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तुलनेत अत्यंत वेगाने पसरत आहे कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 27 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णसंख्या 271,728,668 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 5,336,815 जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरातील अनेक देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी चिंता वाढवली आहे. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन बहुतेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि तो अभूतपूर्व वेगाने पसरत आहे असं म्हटलं आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील बहुतांश देशांमध्ये शिरकाव केला असून भारतातही ओमायक्रॉनची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. फक्त आफ्रिकन देशांमध्येच नाही तर अमेरिका, युरोपमध्येही ओमायक्रॉन प्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत आहे
जागतिक आरोग्य संघटनेने प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. आतापर्यंत 77 देशांनी ओमायक्रॉनच्या प्रकरणांची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंट हा याआधी आलेल्या कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तुलनेत अत्यंत वेगाने पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न हे केले जात आहेत.
टेड्रोस म्हणाले की डब्ल्यूएचओ बूस्टर डोस देण्याच्या विरोधात नाही. परंतु लसीकरणाबाबत असमानता चिंताजनक आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करतो की केवळ लस कोणत्याही देशाला या संकटातून वाचवू शकत नाही. पण तरी देखील ती अत्यंत गरजेची आहे.
देशांनी ओमायक्रॉन प्रकाराचा प्रसार थांबवला पाहिजे. परंतु लसीकरण दर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलतात. 41 देशांमध्ये, अद्याप लसीकरण पात्र लोकसंख्येच्या 10% पर्यंत पोहोचलेले नाही. तर 98 देशांमध्ये ते अद्याप 40 टक्क्यांपर्यंत पोहोचलेले नाही.
वेगवेगळ्या देशांतील लोकसंख्येच्या वेगवेगळ्या गटांमध्ये लसीकरणाचे दर वेगवेगळे असतात. ओमायक्रॉन समोर कोरोना लस देखील कमजोर पडत असल्याचं डेटामधून समोर आलं आहे. डेटानुसार, कम्युनिटी ट्रान्समिशन होत असल्याने नवा व्हेरिएंट हा डेल्टाहून पुढे जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी नवीन प्रकारच्या व्हेरिएंटचा अर्थ असा नाही की परिस्थिती आणखी वाईट होईल, परंतु, निश्चितच ती अधिक अनिश्चित होईल असं म्हटलं आहे.
डॉ. खेत्रपाल एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, महामारीचा धोका अजूनही कायम आहे. नवीन व्हेरिएंट येणे आणि जगाच्या इतर भागांमध्ये वाढत्या रुग्णांमुळे जागतिक स्तरावर कोविड-19 चा धोका कायम आहे.
दक्षिण आशिया क्षेत्रामध्ये, आपण शस्त्रे ठेवू नयेत. आपण सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना मजबूत करणे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवणे सुरू ठेवले पाहिजे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 5 राज्यांना त्याचा फटका बसला आहे.
डॉ खेत्रपाल य़ांनी ओमायक्रॉनचा जगात झालेला प्रसार आणि मोठ्या प्रमाणात म्युटेशनसह काही वैशिष्ट्यांचा महामारी प्रणालीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्याचा नेमका काय परिणाम होईल हे जाणून घेणे थोडे कठीण आहे असं म्हटलं आहे.