Omicron Variant : ओमायक्रॉनच्या संकटात डबल मास्क करणार बचाव?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, रिसर्चमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 05:44 PM 2022-01-14T17:44:42+5:30 2022-01-14T18:17:23+5:30
Omicron Variant : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जाते.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डबल मास्क लावण्याचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला जात आहे. अनेक सेलिब्रिटी आणि अधिकारी आपल्या चेहऱ्यावर दोन मास्क लावताना दिसत आहेत.
सेलिब्रिटींनी केलेला दोन मास्कचा वापर आणि तज्ज्ञांचा सल्ला बघता वैज्ञानिक दृष्टीकोनातून दोन मास्कचा वापर खरोखर योग्य आहे का हे जाणून घेणे महत्वाचं आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यावर दोन मास्क लावल्याने आपले व्हायरसपासून संरक्षण होऊ शकतं.
ओमायक्रॉनने चिंता वाढवली असून जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील तज्ज्ञ या कोरोनाच्या या प्रकाराविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या शोधांद्वारे अनेक तज्ज्ञांनी या व्हायरसच्या प्रकाराविषयी आपलं म्हणणं मांडलं आहे.
एका नव्या रिसर्चनुसार, दोन मास्कचा वापर केल्याने ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव केला जाऊ शकतो. कोरोनाच्या 'डेल्टा व्हेरिएंट'हून 'ओमायक्रॉन' हा अधिक संक्रमक असला तरी तो 'डेल्टा' इतका धोकादायक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
हाँगकाँगच्या दोन व्हायरस तज्ज्ञांनी या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी मास्कच्या वापराविषयी आपलं मत मांडलं आहे. आजारी किंवा अधिक धोका असलेल्या लोकांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग टाळण्यासाठी दोन फेस मास्क घालावा, असा सल्ला या तज्ज्ञांकडून देण्यात आला.
हाँगकाँगच्या चीनी विद्यापीठातील प्राध्यापक आणि सरकारच्या वैज्ञानिक समितीचे सदस्य डेविड हुई यांनी सर्जिकल मास्कवर कापडाचा मास्क परिधान करण्याचा सल्ला दिला आहे. हुई यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेकदा सर्जिकल मास्क थोडा सैल असतो.
अशावेळी तोंडावरची उरलेली जागा झाकण्यासाठी कापडी मास्क घालणं अत्यंत महत्वाचं ठरू शकतं. यामुळे कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा वाढता धोकाही कमी होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
उच्च जोखीम गट, अधिक संसर्ग फैलावलेला परिसर आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रवासासाठी वापर करणाऱ्या लोकांनी दोन मास्क वापरणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
प्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्ट यूएन क्वोक युंग यांनी जुने आजार असलेले लोक किंवा ज्यांना कोरोना लस मिळालेली नाही, तसंच विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच उच्च जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डबल मास्क परिधान करणं गरजेचं आहे. यामुळे 'फिल्टरिंग'ची क्षमताही वाढते असं म्हटलं आहे.
हाँगकाँगच्या रुग्णसंख्येवर नजर टाकली असता अद्याप एन 95 मास्कचा व्यापक वापर करण्याची अद्याप आवश्यकता नाही. एन 95 मास्क इतर मास्कहून थोडे अधिक महाग आहेत तसंच दररोजच्या कामांसाठी त्यातून श्वास घेणं कठीण आहे.
साध्या कापडी मास्कचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो, असंही क्वोक युंग यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 31 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.