Omicron Variant : चिंताजनक! 'ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात'; WHOचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 11:00 AM2022-02-02T11:00:05+5:302022-02-02T11:16:45+5:30

Omicron Variant : जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगातील सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल सातत्याने धोक्याचा इशारा देत ​​आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 38 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 382,069,138 वर पोहोचली आहे. तर 5,705,483 लोकांना आपला जीव गमवावा लागला.

कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे.

ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) जगातील सर्व देशांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल सातत्याने धोक्याचा इशारा देत ​​आहे.

WHO ने लोकांना धोका अद्याप टळलेला नाही असं सांगितलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनच्या लाटेचा उच्चांक येणं बाकी आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध (Covid 19 Restrictions) हे हळूहळू शिथिल केले पाहिजेत.

मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 वर बनलेल्या टेक्निकल लिडने हा सल्ला दिला आहे. ऑनलाईन ब्रीफिंगमध्ये, डब्ल्यूएचओ अधिकारी मारिया वेन यांनी "आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेचा पीक येणं बाकी आहे."

"अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दर खूपच कमी आहे आणि या देशांतील लोकसंख्येला कोविड-19 लस मिळालेली नाही. त्यामुळे अशावेळी सर्व बंधनं एकाच वेळी हटवू नयेत" असं म्हटलं आहे.

मारिया वेन म्हणाल्या की, आम्ही नेहमीच सर्व देशांना कोविड-19 निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचं आवाहन केलं आहे. कारण हा विषाणू शक्तिशाली आहे. WHOचे सरचिटणीस म्हणाले की, काही देशांमध्ये असा विश्वास वाढत आहे की लसीकरणाचे चांगले दर आणि ओमायक्रॉनच्या कमी प्राणघातकतेमुळे धोका टळला आहे.

ओमायक्रॉन प्रकार निश्चितपणे अत्यंत सांसर्गिक आहे परंतु खूप घातक नाही, त्यामुळे अधिक घाबरण्याची गरज नाही. मात्र असा विचार करणं चुकीचं आहे. ते म्हणाले की संसर्ग वाढल्याने मृतांचा आकडाही वाढू शकतो.

पुढे ते म्हणाले, आम्ही असं म्हणत नाही की देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू केलं जावं. परंतु आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या नागरिकांना कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करण्यास सांगावं.

कोरोना या महामारीशी लढण्यासाठी केवळ लस हे एकमेव शस्त्र आहे असं नाही. कोरोना महामारीविरुद्धचे युद्ध आपण जिंकलं आहे, असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे, असेही ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ओमायक्रॉन या व्हेरिएंटमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. एका रिसर्चमधून ओमायक्रॉनबाबत धडकी भरवणारा एक दावा करण्यात आला आहे. ओमायक्रॉन त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर तब्बल 8 दिवस टिकू शकतो असं म्हटलं आहे.

एका नव्या रिसर्चनुसार, SARS-CoV-2 व्हायरसचा ओमायक्रॉन प्रकार त्वचेवर 21 तास, तर प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आठ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. हा प्रकार अधिक संक्रमक असण्यामागे हेच मुख्य कारण असल्याचंही मानलं जातं आहे.

जपानमधील क्योटो प्रिफेक्चरल यूनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे. त्यांनी वुहानमध्ये सापडलेल्या SARS-Cov-2 व्हायरसच्या विविध पृष्ठभागावर जगण्याच्या क्षमतेची इतर गंभीर स्वरूपांशी तुलना केली आहे.

संशोधकांना असे आढळून आले की अल्फा, बीटा, डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकार त्वचेवर आणि प्लास्टिकच्या आवरणावर व्हायरसच्या वुहान व्हेरिएंटपेक्षा दुप्पट जास्त काळ राहू शकतात. हेच कारण आहे की चीनमधील वुहानमध्ये आढळलेल्या मूळ व्हेरिएंटपेक्षा या व्हेरिएंटमधून संसर्ग होण्याचे प्रमाण खूप जास्त नोंदवले गेले आहे.