उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 'जबरा फॅन', ७०० किमी चालत गाठली 'अयोध्या' By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:00 PM 2023-06-05T20:00:25+5:30 2023-06-05T20:03:44+5:30
Yogi Adityanath Birthday : आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज वाढदिवस आहे. दुसरीकडे, योगी आदित्यनाथ यांच्या एका समर्थकाने 'धर्मनगरी' असलेल्या अयोध्येला ७०० किलोमीटरचा पायी प्रवास भेट दिली आणि योगी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या 'जबरा फॅन'ची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दिल्लीतील या तरूणानं योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अयोध्येपर्यंत पायी 'वारी' केली.
मूळचा दिल्लीचा रहिवासी असलेल्या साहिल मलिक या तरूणाने २० मे रोजी दिल्लीहून अयोध्येकडे कूच केली. आज सकाळी तो योगी आदित्यनाथ यांच्या जन्मदिवशी अयोध्येत पोहचला.
७०० किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर साहिल मलिकने हनुमानगढी ते रामजन्मभूमी अशी दंडवत यात्रा काढली.
जय श्री रामचे नारे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणा देत त्यानं आशीर्वाद घेतले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवशी साहिलने प्राचीन सिद्धपीठ हनुमानगढी येथे वेद ब्राह्मणांच्या उपस्थितीत विधीपूर्वक पूजा केली.
पायी प्रवास करणाऱ्या साहिलने सांगितले की, हा प्रवास २२ मे रोजी दिल्लीहून सुरू करण्यात आला होता.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दीर्घायुष्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली होती, जी ५ जून रोजी पवित्र नगरी अयोध्येत पोहोचून संपली, असंही साहिलनं सांगितलं.