एक जमीन होती, ती ही दान केली! मोदी म्हणतात नावावर एकही घर नाही, पंतप्रधानांची संपत्ती किती? By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:53 PM 2023-09-27T17:53:53+5:30 2023-09-27T17:58:03+5:30
PM Narendra Modi's Property: सरकारने लाखो मुलींना घराचा मालक बनविले असेही ते म्हणाले. मोदी सरकारने जवळपास चार कोटी घरे बनविल्याचा दावा मोदी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर एकही घर नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या सरकारने लाखो मुलींना घराचा मालक बनविले असेही ते म्हणाले. मोदी सरकारने जवळपास चार कोटी घरे बनविल्याचा दावा मोदी यांनी केला. याचबरोबर त्यांनी गांधीनगरमध्ये एक जमीन होती, ती देखील दान केल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींची संपत्ती किती? असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान कार्यालयाने मोदींच्या मालमत्तेची माहिती जाहीर केली होती. यानुसार मोदी लखपती नाही तर करोडपती आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पीएमओनुसार 2.23 कोटींची संपत्ती आहे. मोदींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाहीय. एक जमिनीचा तुकडा होता तो त्यांनी दान केला होता.
31 मार्च 2022 ला मोदींकडे 35,250 रुपये रोख होते. पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये 9,05,105 रुपये गुंतविलेले होते. 1,89,305 रुपयांची जीवन विमा पॉलिसी होती.
मोदींच्या जंगम मालमत्तेत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत २६.१३ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
मोदींची कोणत्याही बाँड्स, स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही किंवा त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही.
31 मार्चपर्यंत अपडेट केलेल्या त्यांच्या घोषणेनुसार कोणतेही वाहन नसून त्यांच्याकडे 1.73 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.