एक हजार वर्षांपूर्वीच्या लायब्ररीला पुन्हा मिळालं गतवैभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 03:05 PM2019-12-21T15:05:30+5:302019-12-21T15:08:50+5:30

मोरक्कोच्या फेज शहरात अल- कारावियन ही लायब्ररी इसवी सन 859मध्ये उघडण्यात आली आहे. ही लायब्ररी जगातील सर्वात जुनी लायब्ररी आहे.

छोट्या-मोठ्या बदलांसह या लायब्ररीनं 1000हून अधिक वर्षांचा प्रवास केला आहे.

या लायब्ररीची स्थापना फातिमा-अल-फिहरी, ट्युनिशियातल्या एका व्यापाऱ्याच्या मुलीनं केली आहे.

रिपोर्टनुसार, 2012ला कॅनेडियन-मोरक्को आर्किटेक्टनं याचा चेहरा-मोहरा बदलला होता. त्यांनीच लायब्ररीला गतवैभव प्राप्त करून दिलं.

आता ती सामान्य लोकांसाठी उघडण्यात आली आहे. या लायब्ररीत जगातील सर्वात जुनी पुस्तक आहेत. विशेष म्हणजे या लायब्ररीचं इंटेरियर फारच आकर्षक आहे.