केरळमध्ये 'ओणम' मोठ्या उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 22:08 IST2017-09-04T22:05:31+5:302017-09-04T22:08:24+5:30

केरळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा ओणम सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
ओणम सण केरळ राज्यातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो.
केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या सणानेच सुरू होते.
केरळमध्ये प्रत्येक घराघरात फुलांची रांगोळी काढून ओणम हा सण साजरा करताना पाहवयास मिळते.
ओणम सणाच्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
हा सण १० दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते.