झंडा उँचा रहे हमारा... भारतीय सैन्याने 18 हजार 300 फूट उंचीवर फडकवला तिरंगा By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 11:09 AM2021-08-15T11:09:09+5:302021-08-15T11:33:27+5:30Join usJoin usNext देशभरात आज 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीसह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अन्य महापुरुषांना आदरांजली वाहिली आहे. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा (Happy independence day 2021) दिल्या आहेत. "हे वर्ष नवीन ऊर्जा, चेतना घेऊन येईल" असं मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे वर्ष देशवासियांमध्ये नवी ऊर्जा आणि नवीन चेतना घेऊन येईल. जय हिंद!" असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून देशाला पदके जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. शाळा असो कि पंचायत, गावातील ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीच्या लालकिल्ल्यापर्यंत तिरंगा फडकला. यासोबतच राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशभक्तीमय बनलं आहे. देशाच्या तिन्ही सैन्य दलाकडूनही तिरंग्याला सलामी देण्यात आली. सैन्य दल, वायू दल आणि नेव्ही दलातील जवानांनी तिरंगा फडकावत तिरंग्याला सॅल्यूट केला. डोंक्याला येथे 18,300 फूट उंचीवर सैन्यातील जवानांनी तिरंगा फडकवला. संरक्षण दलाचे प्रवक्ते भारतभूषण बाबू यांनी येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाल्याचे सांगितले. टॅग्स :भारतीय जवानभारतस्वातंत्र्य दिनIndian ArmyIndiaIndependence Day