Our victory continues, now Karnataka is the turn!
जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है ! By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 04:08 PM2018-03-06T16:08:25+5:302018-03-06T16:08:25+5:30Join usJoin usNext नवी दिल्ली: ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. यावेळी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आल्यानंतर 'जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है', अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेला. संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून अनेक विधेयके या अधिवेशनात मंजूरीसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. या सगळ्याबाबत संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. टॅग्स :भाजपाBJP