पाकिस्तानचा 'फतह २' भारतासाठी धोकादायक; अमेरिकन थिंक टँकचा इशारा, नेमकं काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:27 PM2024-05-30T14:27:06+5:302024-05-30T14:30:37+5:30

पाकिस्तानचा फतह २ जीएमएलआरएस (Fatah II GMLRS) भारतासाठी धोकादायक ठरू शकतं असा इशारा अमेरिकेच्या थिंक टँकनं दिला आहे. हे शस्त्र भारताचं हवाई सुरक्षा कवच म्हणजे एअर डिफेन्स सिस्टम भेदण्यास सक्षम आहे. जर भारत पाकिस्तानात संघर्ष झाला तर फतह २ रॉकेट्स भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमला ९५ टक्के उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे.

इतकेच नाही रशियाकडून भारताला मिळालेल्या S 400 एअर डिफेन्स सिस्टमलाही हे टक्कर देऊ शकते. पाकिस्तानने मागील महिन्यात या ताकदवान रॉकेटचं यशस्वी परिक्षण केले आहे. जवळपास ४०० किमी टार्गेट भेदणारे रॉकेट आर्टिलरी आहे.

माहितीनुसार, या रॉकेटचं नेव्हिगेशन सिस्टम, ट्रैजेक्टरी आणि दिशा गतीमध्ये बदल करण्याची क्षमता हे या अतिशय खास आणि धोकादायक आहे. फतह २ गाइडेड रॉकेट सिस्टम आहे. ही पाकिस्तानातील मल्टी लॉन्च रॉकेट सिस्टम आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या दाव्याप्रमाणे, या रॉकेटच्या टार्गेटला भेदण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यात स्टेट ऑफ द आर्ट नेव्हिगेशन सिस्टम, खास ट्रैजेक्टरी आणि मॅन्यूवरेबल फिचर्स आहेत. याचा अर्थ हे रॉकेट हवेत आपली दिशाही त्याच वेगाने बदलू शकते असं सांगण्यात येत आहे.

फतह २ रॉकेट त्याच्या टार्गेटला अत्यंत जवळून संपवण्याची ताकद ठेवते. ही जगातील कुठल्याही मिसाइल डिफेन्स सिस्टमला उद्ध्वस्त करू शकते अथवा चकवा देऊ शकते. ही रॉकेट सिस्टम पाकिस्तानच्या आर्टिलरी डिविजनमध्ये सामील केले जाईल अशी घोषणा पाकिस्ताननं केली होती.

फतह २ रॉकेट सिस्टम सीमेपासून दूर असलेल्या टार्गेटला निशाणा बनवण्यासाठी स्टँडऑफ प्रेसिशन इंगेजमेंटसाठी पाकिस्तानी सैन्यात सामिल केले आहे. अद्याप याला आणखी अपग्रेड केले जाणार आहे परंतु हे पारंपारिक शस्त्रासह टार्गेट उद्ध्वस्त करू शकते.

फतह २ रॉकेट सिस्टम रेंज ४०० किमी असल्याचं बोललं जातं. यापूर्वीची फतह १ ची रेंज १४० किमी होती. पाकिस्तानी लष्कर फतह-१, चायनीज ए-१००, यर्मौक सीरीज आणि नसर टेक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे.

फतह-२ हे भारताच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीविरुद्ध प्रभावी शस्त्र असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. मात्र, भारतही देशाच्या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. याआधी भारताने आपल्या संरक्षण यंत्रणेत अनेक लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा समावेश केला आहे.

शेजारील राष्ट्राला वाटतं, भारतानं त्यांच्या या रॉकेटपासून घाबरावं, परंतु असं होणार नाही. १९४७ पासून पाकिस्ताननं अनेकदा भारतावर हल्ला आणि युद्ध केले आहे. परंतु प्रत्येकवेळी तोंडावर आपटलं आहे. जर फतह २ ची तुलना भारताच्या कुठल्याही रॉकेट आर्टिलरीशी केली तर ते कधीही टीकणार नाही.