People from all over the world fall in love with these ten things in India
भारतातील या दहा गोष्टींच्या प्रेमात पडतात जगभरातील लोक By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 04:04 PM2019-07-24T16:04:33+5:302019-07-24T16:35:07+5:30Join usJoin usNext विविधतेने नटलेला आपला भारत देश हजारो वर्षांपासून संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करत आला आहे. आजही येथील वैशिष्ट्यपूर्ण अशा अनेक गोष्टी संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात. जाणून घेऊया अशाच काही गोष्टींविषयी. वैविध्यपूर्ण संस्कृती भारत देश विविधतेने नटलेला आहे. येथे राहणीमान, खानपान, प्रथा, परंपरा याबाबत मोठी विविधता आहे. ही विविधताच परदेशी व्यक्तींना भारताकडे आकर्षित करते. आयटी गेल्या काही वर्षांत भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. जगभरातील अनेक आघाडीच्या देशात आयटी क्षेत्रात भारतीय व्यक्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे परदेशात प्रत्येक भारतीय व्यावसायिकाकडे सुरुवातील आयटी प्रोफेशनल म्हणून पाहिले जाते. ताजमहाल मुघल बादशहा शाहजहाँन याने पत्नीच्या स्मरणार्थ आग्रा येथे बांधलेला ताजमहाल हा आज जगभरात प्रेमाची निशाणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या वास्तूला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. रॉयल बंगाल टायगर वाघ हा भारतातील वन्यजीवनातील खास प्राणी आहे. त्यामुळे भारतीय वाघ पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात. सध्या जगात अस्तित्वात असलेल्या एकूण वाघांपैकी सुमारे 60 टक्के वाघ हे भारतीय जंगलांमध्ये आहेत. विवाह सोहळे भारतातील विवाहसोहळे त्यातील विशिष्ट्य परंपरा आणि पै पाहुण्यांच्या गर्दीमुळे परदेशी व्यक्तींसाठी खास आकर्षण ठरतात. परदेशांमध्ये एवढा गाजावाजा करत विवाह सोहळे आयोजित केले जात नाहीत. त्यामुळे भारतातील विवाह सोहळे पाहावेत, अशी अनेक परदेशी व्यक्तींची इच्छा असते. मसालेदार खाद्यपदार्थ भारतीय भोजनामध्ये खास मसालेदार चमचमीत पदार्थांचा भरणा असतो, असे पदार्थ साधे भोजन करणाऱ्या परदेशी व्यक्तींना फार आवडतात. त्यामुळेच सध्या जगभरात भारतीय भोजन देणाऱ्या रेस्टॉरंटची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बॉलीवूड - अनेक देशांमध्ये बॉलीवूड ही भारताची ओळख बनले आहे. मनोरंजन करणारे चित्रपट, संगीत आणि नृत्यामुळे पाश्चात्य देशात बॉलीवूडची लोकप्रियता वाढत आहे. क्रिकेट भारतीयांचे क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. त्यामुळे भारतीय व्यक्ती परदेशात कुठेही गेली तरी त्यांना क्रिकेटसंदर्भात प्रश्न विचारले जातात. योग योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये योगची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. आता तर 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. चहा भारतीय चहा जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळेच चहा निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा वरचा क्रमांक लागतो. त्यातही दार्जिलिंग येथील चहाला जगात मोठी मागणी आहे. टॅग्स :भारतआंतरराष्ट्रीयसांस्कृतिकट्रॅव्हल टिप्सIndiaInternationalcultureTravel Tips