धक्कादायक! लोकांना करता येईना ई-मेल अन् कॉपी पेस्ट; ५६% भारतीय मोबाइलवर करताहेत टाइमपास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 12:25 PM2024-06-30T12:25:51+5:302024-06-30T12:30:26+5:30

२०३० पर्यंत देशात सुमारे ९६ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते असतील, असा अंदाज आहे.

देशातील तब्बल १.२ अब्ज लोकांकडे मोबाइल आहेत. यापैकी सुमारे ७१ कोटी स्मार्टफोन वापरतात. २०३० पर्यंत देशात सुमारे ९६ टक्के स्मार्टफोन वापरकर्ते असतील, असा अंदाज आहे. असे असले तरीही तब्ब्ल ५६.२ टक्के लोक फोन फक्त मनोरंजनासाठी वापरत आहे. संगणक साक्षरतेच्या बाबतीत शहरी व ग्रामीण तरुणांचे ज्ञान फारच कमी असल्याचे नॅशनल सॅम्पल सर्वेक्षणातून समोर आले.

सर्वेक्षणानुसार, संगणक साक्षरता असलेले सर्वाधिक ४१.८ टक्के लोक चंडीगड येथे आहेत. दुसऱ्या स्थानी दिल्ली (३८.९%) आहे. छत्तीसगडमध्ये वाईट स्थिती असून, येथे ९५.१ टक्के लोकसंख्येला ई-मेल करता येत नाही.

९४.९ % भारतीयांना प्रेझेंटेशन कसे तयार करायचे हे माहिती नाही. ९८.६ % भारतीयांना संगणक प्रोग्राम कसा बनवायचा हे माहीत नाही. ९२.५% भारतीयांना एक उपकरण दुसऱ्याशी कसे जोडायचे हे माहीत नाही. ९४.१% भारतीयांना स्प्रेडशीटवर कसे काम करावे हे माहीत नाही.

लोकांना संगणकावर फाइल फोल्डर तयार करणे आणि कॉपी आणि पेस्ट करणे जमत नाही. १४ टक्के लोकच संगणकावर टेक्स्ट फाइल तयार करू शकतात, तर १२ टक्के मेल पाठवू शकतात. राज्यांच्या तुलनेत केंद्रशासित प्रदेशांमध्ये संगणक अधिक चांगला वापरता येत आहे.

त्रिपुरा ९६%, छत्तीसगड ९५.१%, बिहार ९५.१%, मणिपूर ९३.७%, ओडिशा ९३.१%, झारखंड ९२.९%, आसाम ९२.६%, उत्तर प्रदेश९२.१%, पश्चिम बंगाल ९१.५%, मध्य प्रदेश ९१.४%.

चंडीगड - ४१.८%, दिल्ली - ३८.९%, नागालँड - ३८.६%, लक्षद्वीप- ३४.२%, पुद्दचेरी - ३१.४%, गोवा - २९.९%, केरळ - २७.२%, दीव दमन - २५.७%, सिक्कीम - २४.४%, दादरा नगर - २३.०%.

७५% भारतीयांना संगणक फोल्डर कसे तयार करावे ही बाब माहीत नाही. ७६% जण डॉक्युमेंटमधील माहिती कॉपी व पेस्ट करण्याचे काम करु शकत नाहीत.