केरळवासीयांनी ओणम सण आनंदात केला साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 11:50 PM2018-08-27T23:50:04+5:302018-08-27T23:52:56+5:30

केरळमध्ये पुरामुळे सगळंच उद्ध्वस्त झालं असतानाच केरळवासीयांनी ओणम सण आनंदात साजरा केला.

ओणम सण केरळ राज्यातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो.

केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या सणानेच सुरू होते.

केरळमध्ये प्रत्येक घराघरात फुलांची रांगोळी काढून ओणम हा सण साजरा करताना पाहवयास मिळते.

ओणम सणाच्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

हा सण १० दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते.