काशी विद्यापीठामध्ये भरले कलाकृतींचे प्रदर्शन... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:02 PM 2019-01-25T13:02:59+5:30 2019-01-25T13:06:42+5:30
वाराणसीमधील महात्मा गांधी काशी विद्यापीठामध्ये तरुण कलाकारांनी गुरुवारी कला-शिल्पाकृतीतून कल्पनाशक्तीचे प्रदर्शन केले.
चित्रांसह मूर्ती, आर्टिफिशियल ज्वेलरी, खेळणी, फोटो फ्रेम या प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरले. ललित कला विभागाने विद्यापीठात तीन दिवसीय कला प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
प्रदर्शनामध्ये 16 स्टॉल आणि 140 कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या.
आईस्क्रीम खाण्यासाठीच्या चमच्यांच्या आधारे शिवलिंगासह विविध वस्तू बनविण्यात आल्या होत्या.
तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला साधुंचे चेहरे दाखवून वृक्षतोडीबाबतचा संदेश दाखविण्यात आला होता. तर ओंडक्याची पेन्सिल बनविण्यात आली होती.
एका झाडाच्या बुंध्याला एका साधुच्या चेहऱ्याचा आकार देण्यात आला होता.
तारा आणि छोट्या पत्र्याच्या डब्यांच्या सहाय्याने जुन्या काळची ट्राम बनविण्यात आली होती.