Photos: चोमोलीत NDRF आणि ITBP जवान उतरले चिखलात, कामगारांचा शोध सुरुच

By महेश गलांडे | Published: February 8, 2021 09:37 AM2021-02-08T09:37:34+5:302021-02-08T10:15:27+5:30

उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून आलेल्या भीषण जलप्रलयामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या जलप्रलयादरम्यान, दुर्घटनास्थळी अनेक लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे.

उत्तराखंडमधील महापुरात आत्तापर्यंत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अद्यापही येथील भोगद्यात कामगार अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम एनडीआरएफ जवानांकडून होत आहे.

एनडीआरएफ आणि वायुसेनाच्या जवानांनी श्वान पथकासह भोगद्यात रात्रीपासून शोधमोहिम सुरु ठेवली, अद्यापही ही शोधमोहीम सुरुच आहे.

आयटीबीपीच्या जवानांनी 16 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यानंतर दुसऱ्या सुरुंगातही 30 जण अडकल्याची माहिती मिळाली. त्यामुळे, रात्री उशिरापर्यंत या सर्वांचा शोध घेण्यात येत होता.

भोगद्याजवळ मातीची जमीन दिसून आली, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या चिखलातून माणसं शोधताना मोठी कसरत करावी लागत आहे

एनडीआरएफ जवान आणि आयबीटीपीचे जवान चिखलात उतरुन अडकलेल्या कामगारांचा शोध घेत आहेत, जवळपास 30 फूट खोलपर्यंत परिसरात चिखल आहे.

उत्तराखंडमधील प्रलयानंतर वायू सैन्याने हवाई पाहणी दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर सैन्य दलाला बोगद्यात उतरविण्यात आले.

56 मरीन कमांडो बचाव कार्यासाठी तयार असून मुंबईत 16 आणि दिल्लीत 40 जवान मोहिमेसाठी सज्ज आहेत

जखमींना बोगद्यातून बाहेर काढताच, रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

सैन्याचे 400 जवान जोशीमठ आणि ओली येथे पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. तसेच, आणखी 200 स्टँडबॉय म्हणून तैनात आहेत. आज दिवसभर ही शोधमोहिम सुरुच राहणार आहे.