असा आहे महात्मा गांधींचा साबरमती आश्रम By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 08:02 PM 2018-06-18T20:02:28+5:30 2018-06-18T20:02:28+5:30
महात्मा गांधीजींनी उभारलेल्या साबरमती आश्रमाला आज (17 जून 2018) 101 वर्ष पूर्ण होत आहेत.
महात्मा गांधीजींनी 1917 साली या आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर 13 वर्ष गांधीजी येथे राहत होते.
1930 मध्ये 'मीठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या 78 साथीदारासोबत बापुजींनी 'दांडी यात्रा' काढली होती.
स्वराज्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांनी संकल्पच केला होता. गुजरातमधील अरबी समुद्र किनार्यावर ब्रिटिश सरकार विरुध्द गांधीजी यांनी मीठाचा सत्याग्रह केला. त्यानंतर त्यांना अटक होऊन येरवडा तुरूंगात ठेवण्यात आले.
1933 मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजी यांनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. तोपर्यंत 'स्वराज्य' न मिळाल्याने ते साबरमती आश्रमात परतले नाहीत.
महात्मा गांधीजींनी 1917 साली या आश्रमाची स्थापना केली.