This place in India is the sacred capital of three religions
भारतातलं हे ठिकाण आहे तीन धर्मांचं पवित्र श्रद्धास्थान By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 04:05 PM2019-10-31T16:05:57+5:302019-10-31T16:14:15+5:30Join usJoin usNext हिंदूंमध्ये धार्मिकदृष्ट्या काशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरा यासह अनेक गोष्टींचा काशीमध्ये संगम पाहायला मिळतो. गीता नि गाय यांच्या इतकीच पवित्र असलेल्या गंगेच्या तीरावर वसलेलं काशी वसलेलं आहे. प्रत्येक हिंदूनं आयुष्यात एकदा तरी जाऊन गंगेत डुबकी मारावं, असं म्हटलं जातं ती काशीच. काशी हे तीन धर्मांचं पवित्र ठिकाण आहे. वाराणसीत अनेक घाट आहेत. विवाहित जोडप्यानं या घाटांवर स्नान केल्यास त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात, असं सांगितलं जातं. मणिकर्णिका घाटही प्रसिद्ध असून, अनेक वर्षांपासून तिथे मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. सारनाथ- वाराणसीत 10 किमी पूर्वेला सारनाथ हे बौद्ध धर्माचं तीर्थक्षेत्र आहे. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा महात्मा बुद्धांनी इथे उपदेश दिला होता. वाराणसीत 18व्या शताब्दीमध्ये दुर्गा मंदिर बनवलं होतं. या मंदिरात अनेक माकडं असल्यानं त्याला मंकी टेम्पलही म्हटलं जातं. दुर्गा मातेची प्रतिमा इथे स्वयं प्रकट झाली होती. विश्वनाथ मंदिर- काशी विश्वनाथ मंदिराला इथे स्वर्ण मंदिर म्हटलं जातं. या मंदिराची वाराणसीत सर्वोच्च महिमा आहे. या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानं अनेक लाभ होत असल्याची आख्यायिका सांगितली जाते. जैन मंदिर- सारनाथमध्येही एक जैन मंदिरही स्थापित आहे. हे मंदिर 7वे जैन तीर्थकार सुप्रश्वनाथ यांनी तयार केलं आहे. या मंदिरात श्वेतांबर संप्रदायाद्वारे पूजा केली जाते.