PM Kisan: 10 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 31 मे रोजी PM मोदी ट्रान्सफर करणार 11व्या हप्त्याचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:31 PM2022-05-29T22:31:36+5:302022-05-29T22:36:30+5:30

PM Kisan Yojana: यावेळी पंतप्रधान मोदी 21 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या 11व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करतील.

जर आपण PM किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची (pm kisan samman nidhi 11th installment) वाट पाहत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतील. 11व्या हप्त्याचे पैसे 31 मे रोजी ट्रान्सफर केले जातील.

यावेळी पंतप्रधान मोदी 21 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या 11व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करतील. शिमला येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान लाभार्थ्यांशीही संवाद साधतील.

पंतप्रधान मोदी शिमला येथे राष्ट्रीय स्तरावरील गरीब कल्याण संमेलनात सहभागी होतील. यावेळी ते 9 केंद्रीय मंत्रालये आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमादरम्यान 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाणार आहे.

जर आपण अद्यापही केवायसी अपडेट केले नसेल, तर ते तत्काळ करून घ्या. अन्यथा, आपले 11व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात. आपल्याजवळ केवळ 31 मेपर्यंतच केवायसी अपडेट करण्याची संधी आहे.

PM किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.