PM Kisan Yojana: कुठेही जायची गरज नाही; तुमच्या स्मार्टफोनवरून अर्ज करा, वर्षाला 6000 मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 12:12 PM 2021-09-12T12:12:08+5:30 2021-09-12T12:16:29+5:30
pm kisan samman nidhi application process: देशातील छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली आहे. जाणून घ्या कसे कराल रजिस्ट्रेशन. केंद्र सरकारने 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, जेव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारी योजनांचे पैसा थेट जाईल तेव्हाच त्यांना त्याचा लाभ मिळेल. यामुळे मोदी सरकार डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफरद्वारे वेगवेगळ्या योजना लाँच केल्या जात आहेत. (how to register farmers PM Kisan Yojana though Smartphones; will get 6000 yearly)
यानुसार गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी (PM kisan Samman Nidhi) योजनेचा लाभ देत आहे. परंतू आजही अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. देशातील छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार या योजनेतून आतापर्यंत 12 कोटींहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांचा लाभ मिळतो. ही रक्कम तीन हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आतापर्यंत 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली गेली आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोाईलवरून घेऊ शकता.
pm kisan samman nidhi application process: आतापर्यंत केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधीनुसार 9 हप्ते जारी करण्यात आले आहेत. म्हणजे एका शेतकऱ्याच्या खात्यात आजवर 18000 रुपये पोहोच झाले आहेत. जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घरबसल्या स्मार्टफोनद्वारे यासाठी अर्ज करू शकता.
सर्वात आधी तुम्ही मोबाईलमधील Google Play Store मध्ये जाऊन PM Kisan GoI Mobile App डाउनलोड करा. हे अॅप ओपन झाल्यावर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. यामध्ये आधार नंबर टाकून तुमचे राज्य निवडा.
यानंतर इमेज कोड म्हणजेच कॅप्चा टाईप करा. सर्वात शेवटी तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल. यामध्ये तुमचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आदी द्यावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा खाते क्रमांक आणि अन्य माहिती भरावी लागेल. जी तुमच्या सातबाऱ्यावर असेल. यानंतर सबमिट बटन क्लिक करा.
मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केल्यावर काही दिवसांनी तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबर- 155261/011-24300606 वर फोन करून तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
जर तुम्ही मोबाईलद्वारे अर्ज करू शकत नसाल तर जवळच्या सीएससी केंद्रात जावे लागणार आहे. याशिवाय तुम्ही पीएम किसान निधीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. पीएम किसान निधी दुप्पटही होण्याची शक्यता आहे.