बांबूच्या गार्डनमधून थेट विमानात! मोदींनी उदघाटन केलेलं बंगळुरूचं नवं टर्मिनल कसलंच भारीय, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 06:11 AM2022-11-12T06:11:09+5:302022-11-12T06:18:36+5:30

बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी उद्घाटन केले.

या टर्मिनलला ‘टर्मिनल इन गार्डन’ असे टोपणनाव अनेकांनी दिले आहे.

यातून शहराची गार्डन सिटी ही ओळख जपण्यात आली आहे. 

टर्मिनलचे सर्वांत चर्चिले गेलेले वैशिष्ट्य म्हणजे तेथील अंतर्गत सजावटीसाठी बांबूंचा वापर करून शोभा वाढवली आहे.

यासाठी इंजिनीअर्ड बांबूंचा वापर करण्यात आला आहे.

सिलिंग, पिलर्स, रेलिंग, स्टेअरकेसेस इत्यादींसाठी हा बांबू वापरला आहे. 

इंजिनिअर्ड बांबू हा एक प्रकारे प्रक्रिया केलेला बांबू असून अंतर्गत सजावटीसाठी अलिकडच्या काळात त्याचा वापर वाढला आहे.

स्थानिक ‘बांबूज- फर्न बांबू प्रा.लि.’ या कंपनीला अंतर्गत सजावटीचे काम देण्यात आले होते.

बंगळुरू  केम्पेगोडा  विमानतळाची शोभेसाठी५००० कोटी रुपये खर्च

५-६ कोटी प्रवासी टर्मिनल-२ वरून वर्षभरात प्रवास करतील. १० हजार स्क्वेअर मीटर परिसरात उभारल्या ग्रीन वॉल, गार्डन