PM Modi visited 58 countries in 2015 which cost Rs 517.82 crore says MEA
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आतापर्यंत किती खर्च झाला?; अखेर आकडा समोर आला By कुणाल गवाणकर | Published: September 22, 2020 04:36 PM2020-09-22T16:36:10+5:302020-09-22T16:42:02+5:30Join usJoin usNext कोरोना संकट काळात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. रविवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे वातावरण तापलं आहे. मात्र लिखित स्वरुपात प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे कायम चर्चेचा विषय राहिला आहे. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असतात, अशी टीका वारंवार विरोधकांकडून होत असते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांवर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र त्यातून हाती काय लागतं, असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. आज संसदेत परराष्ट्र मंत्रालयानं मोदींच्या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा नेमका आकडा सांगितला आहे. मोदींनी २०१५ पासून आतापर्यंत ५८ देशांना भेटी दिल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. एका खासदारानं मोदींचे दौरे आणि त्यावर होणारा खर्च याबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावर २०१५ पासून आतापर्यंत मोदींच्या दौऱ्यांवर ५१७.८२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यादरम्यान भारतानं अनेक देशांसोबत करार केले. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण करारांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मोदींनी कोणताही परदेश दौरा केलेला नाही. गेल्या सहा महिन्यांत एकही आंतरराष्ट्रीय नेता भारतात आलेला नाही. फेब्रुवारीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. त्यानंतर कोणताही मोठा नेता भारत दौऱ्यावर आलेला नाही. कोरोना संकट काळात पंतप्रधान मोदी परदेशातील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. मोदींनी अनेकदा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच सहभाग घेतला आहे. मोदी याच आठवड्यात संयुक्त राष्ट्राला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रमदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच होईल.टॅग्स :नरेंद्र मोदीNarendra Modi