PM Modi's Birthday Celebration with mother hiraben modi
मोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 03:52 PM2019-09-17T15:52:49+5:302019-09-17T16:17:23+5:30Join usJoin usNext पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी 69 वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वाढदिवसानिमित्त 7 हजार किलो आणि 700 फूट लांब असा केक कापून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. मोदींनी सरदार सरोवर येथे जाऊन लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच, सरदार सरोवर येथे फेरफटका मारत नर्मदा नदीला नमन केले. मोदींनी सरदार सरोवर येथे जाऊन लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच, सरदार सरोवर येथे फेरफटका मारत नर्मदा नदीला नमन केले. सूरत येथील सरसाना कन्वेंशन सेंटरमध्ये 700 प्रामाणिक लोकांकडून मोदींच्या वाढदिवसाचा केक कापण्यात येणार आहे. केवडिया येथील गार्डनमध्ये मोदींनी पाहणी केली. त्यावेळी, नर्मदा नदीच्या पाण्याची पातळी आणि परिसरही मोदींनी पाहिला मोदींच्या स्वागताची अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती, यावेळी विविध लोकनृत्यही सादर करण्यात आले मोदींनी नेहमीप्रमाणे यंदाही अहमदाबाद येथील आपल्या घरी जाऊन आईचे दर्शन घेतले. आईचे दर्शन घेतल्यानंतर मोदींनी आईसमेवत वेळ घालवला, यावेळी गप्पा-टप्पा, जुन्या आठवणी आणि मायेचा ओलावा जपणारा संवाद साधला. मोदींनी आईसमवेतच मोदींनी दुपारच्या जेवणाचा आनंद लुटला. त्यावेळी नरेंद्र मोदींना पाहुन त्यांच्या मातोश्री हेराबेन यांनाही अत्यानंद झाला होताटॅग्स :नरेंद्र मोदीराजकारणगुजरातNarendra ModiPoliticsGujarat