विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये नरेंद्र मोदींची ध्यानधारणा; पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:26 AM2024-05-31T10:26:49+5:302024-05-31T10:53:21+5:30

Narendra Modi : ध्यानधारणा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान सुरू केलं आहे. गुरुवारी (दि.३०) सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी इथं ध्यान करण्यास सुरुवात केली. ते पुढील ४५ तास ध्यान करणार आहेत.

या ४५ तासांत ते अन्नाच्या कणालाही हात लावणार नाहीत. ध्यानधारणा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवती अम्मन मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पूजा अर्चना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या ४५ तासांत ते फक्त नारळ पानी, द्राक्षाचा रस आणि इतर तरल पदार्थ घेतील. या काळात ते ४५ तास मौन पाळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान करणार असून त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

विवेकानंद रॉक मेमोरिअल समुद्रात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आला आहे. या ठिकाणी २००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

तसेच, भारतीय तट रक्षक दल आणि नौदलाचे जवानही तैनात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या दोन दिवसांत प्रवाशांना कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यात बंदी घालण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ध्यान साधनेची माहिती यापूर्वीच भाजपा नेत्यांनी दिली होती.

२०१९ सालीही निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा केली होती. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे गेले होते.