Petrol Diesel Hike : कुणावरही टीका कराण्याची इच्छा नाही, पण...; अखेर पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं! By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 17, 2021 08:59 PM 2021-02-17T20:59:46+5:30 2021-02-17T21:16:13+5:30
PM Narendra Modi on petrol diesel price hike and launched several major projects in oil and gas sector in Tamilnadu : मोदी म्हणाले ‘‘आपण आयातीवर एवढे अवलंबून असायला हवे? कुणावरही टीका करण्याची माझी इच्छा नाही. पण... (PM Narendra Modi on petrol diesel price hike) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग नवव्या दिवशी वाढ झाली. याच बरोबर पेट्रोलच्या दराने देशात पहिल्यांदाच 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीवर आपले मौन सोडत, पूर्वीच्या सरकारांनी इंधन आयातीवरील निर्भरतेवर लक्ष दिले असते, तर आज मध्यम वर्गाला अशा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला नसता, असे म्हटले आहे. पाहूया, मोदी आणखी काय म्हणाले...
यावेळी मोदींनी सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीचा उल्लेख केला. 2019-20 मध्ये भारताने मागणी पूर्ण करण्यासाठी 85 टक्के तेल आणि 53 टक्के गॅसची आयात केली.
आज पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूमध्ये एन्नौर-थिरुवल्लूर-बेंगळुरू-पुदुच्चेरी-नागापट्टिनम-मदुराई-तुतीकोरिन नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या रामनाथपुरम- थुथूकुडी खंडाचे उद्घाटन केले.
यानंतर आपल्या भाषणात मोदी म्हणाले ‘‘आपण आयातीवर एवढे अवलंबून असायला हवे? कुणावर टीका करण्याची माझी इच्छा नाही. मात्र, एवढे नक्कीच बोलायचे आहे, की जर आपण या विषयावर लक्ष दिले असते, तर आपल्या मध्यम वर्गाला ओझे सहन करायची वेळ आली नसती.’’
मोदी म्हणाले, ‘‘स्वच्छ आणि हरीत ऊर्जेच्या स्रोतांच्या दिशेने काम करणे आणि ऊर्जा-निर्भरता कमी करणे ही आपल्या सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे.’’
पेट्रोल 100 रुपयांच्याही पुढे - देशात आज पहिल्यांदाच पेट्रोलचे दर 100 रुपयांच्याही पुढे गेले. राजस्थानात पेट्रोलच्या किमतीनी शतक पूर्ण केले आहे. तर मध्यप्रदेशात पेट्रोलचे दर शतकाच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सरकार मध्यम वर्गाला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल संवेदनशील आहे. तसेच आता भारत शेतकरी आणि ग्राहकांची मदत करण्यासाठी इथेनॉलवर लक्ष केंद्रीत करत आहे. मोदी म्हणाले ऊसापासून काढले जाणारे इथेनॉल इंधन आयात कमी करण्यास मदत करेल. तसेच शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एक साधनही उपलब्ध होईल.
मोदी म्हणाले, सरकार अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच 2030 पर्यंत देशात 40 टक्के ऊर्जा उत्पादन होईल.
जवळपास 6.52 कोटी टन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची आशा आहे. आपल्या कंपन्यांनी गुणवत्ता असलेले तेल आणि गॅस संपत्तीच्या अधिग्रहणासाठी परदेशात गुंतवणूक केली आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, सरकारने पाच वर्षांत तेल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीसाठी 7.5 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना तयार केली आहे. तसेच 470 जिल्हे कव्हर करत, शहरात गॅसचा विस्तार करण्यावर जोर दिला आहे. याशिवाय, सरकार सध्याच्या ऊर्जा क्षेत्रात नैसर्गिक गॅसचा वाटा 6.3 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधान मोदींनी मनाली येथील चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सल्फर रहित (डिसल्फरायझनेशन) गॅसोलीन युनिटदेखील देशाला अर्पण केले आणि नागापट्टिनम येथे कावेरी बेसिन रिफायनरीची पायाभरणीही केली.
रामनाथपुरम-थूथुकुडी खंड 143 किलोमीटर लांब असेल. यावर जवळपास 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पापासून नैसर्गिक गॅस उद्योग आणि इतर व्यवसायिक ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यास मदत होईल.
सल्फर विरहित गॅसोलीन युनिटच्या उभारणीसाठी जवळपास 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे 8 पीपीएम असलेले युनिट आहे. तसे याला पर्यावरणाशी अनुकूल गॅसोलीनपासून कमी सल्फरचे उत्पादन करेल असे बनवण्यात आले आहे. याशिवाय हे उत्सर्जन कमी करण्यासही उपयुक्त ठरेल. यामुळे स्वच्छ पर्यावरणासाठी फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी...