PM's Office declared assets of Minister, Narendra Modi donates share in only property owned
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे किती मालमत्ता? PMO चा तपशील, मंत्र्यांच्या बँक बॅलन्सचे रहस्यही उघड By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:58 PM2022-08-09T14:58:11+5:302022-08-09T15:04:17+5:30Join usJoin usNext अलीकडच्या काळात नेत्यांची संपत्ती कोट्यवधीच्या घरात असते. ईडीसारख्या तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर अनेकांचे पितळ उघडे पडतात. नेत्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील १० मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती पुढे आणली आहे. पंतप्रधान कार्यालयानुसार, २०२१-२२ मध्ये पंतप्रधान मोदींची जंगम मालमत्ता २६.१३ लाख रुपये झाली. गुजरातमधील निवासी भूखंडात आपला हिस्सा दान केल्यानंतर पंतप्रधानांकडे आता कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. PMO ने वेबसाइटवर जारी केलेल्या तपशिलांमध्ये म्हटलं आहे की, मार्च २०२१ च्या अखेरीस, PM मोदींची जंगम मालमत्ता १ कोटी ९७ लाख ६८ हजार ८८५ रुपये होती, जी ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढून २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये झाली आहे. या पैशांमध्ये मुदत ठेवी, जीवन विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. अहवालात पीएम मोदींची स्थावर मालमत्ता शून्य दाखवण्यात आली आहे. म्हणजेच त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. नोटीसमध्ये म्हटले आहे की, “रिअल इस्टेट सर्व्हे क्रमांक 401/A हे तिघांमध्ये मालकी हक्क आहे. त्यात प्रत्येकाचा २५ टक्के समान वाटा आहे. तो २५ टक्के वाटा मोदींच्या मालकीचा राहणार नाही कारण त्यांनी तो दान केला. गेल्या वर्षीच्या घोषणेनुसार, सर्व्हे क्रमांक 401/A मध्ये, पंतप्रधान मोदींचा गांधीनगर सेक्टर-1 मधील निवासी भूखंडामध्ये एक चतुर्थांश हिस्सा होता (3,531.45 चौरस फूट) ज्याचे एकूण बाजार मूल्य १.१० कोटी आहे. जंगम मालमत्तेचे विश्लेषण असे दर्शविते की हातात असलेला पैसा किरकोळ कमी झाला आहे. गेल्या वर्षी हातात रोख रक्कम ३६९०० रुपये होती. त्याच वेळी, ती ३५२५० रुपयांपर्यंत खाली आली आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ३१ मार्च २०२१ रोजी पंतप्रधानांची बँक शिल्लक १ लाख ५२ हजार ४८० रुपये होती, जी आता ४६,५५५ रुपयांवर आली आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीची माहितीही पीएमओच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या जंगम मालमत्तेच्या किमती वाढल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मालकीच्या जंगम मालमत्तेचे मूल्य २९.५८ लाख रुपयांनी म्हणजेच २.२४ कोटी रुपयांवरून २.५४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची संपत्ती १.६२ कोटी रुपयांवरून १.८३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी ७.२९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १.४२ कोटी रुपयांनी वाढली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे ३५.६३ कोटी रुपयांची संपत्ती आणि ५८ लाख रुपयांचं कर्ज आहे. त्याच वेळी मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले की त्यांच्याकडे एकूण १.४३ कोटी रुपयांची संपत्ती आहे.टॅग्स :नरेंद्र मोदीNarendra Modi