pollution level gets worst delhi ncr school may close
दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण आतापर्यंतच्या धोकादायक पातळीवर, शाळांना सुट्टी देण्याची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 07:58 PM2017-11-06T19:58:34+5:302017-11-06T20:08:58+5:30Join usJoin usNext दिल्ली आणि एनसीआर येथे राहणा-या नागरिकांचं आयुष्य हानीकारक हवा प्रदूषणामुळे जवळपास 6 वर्षांनी कमी झालं आहे. एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीमधील प्रदूषण आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. येथील हवा इतकी विषारी झालीये की एनसीआरच्या नोयडा आणि गाझियाबादमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स 400 च्या वर पोहोचला आहे. जर एअर क्वालिटी इंडेक्स 450 च्या वर गेला तर लहान मुलांच्या शरीरासाठी ते अत्यत हानीकारक होऊ शकतं, त्यामुळे कदाचीत काही दिवस शाळांना सुट्टी द्यावी लागू शकते. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी दिवाळीत फटाकेबंदी लागू केली होती. लॅन्सेट नियतकालिकेने गेल्या महिन्याच्या अहवालात भारतामध्ये प्रदूषणामुळे दर वर्षी 25 लाख जणांचा मृत्यू होतो असं म्हटलं होतं. त्यापैकी 18 लाख व्यक्तींचा हवेच्या प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती दिली होती. पाण्यात होणाऱ्या प्रदूषण अथवा दूषित पाण्यामुळे ६ लाख ४० हजार जणांचा मृत्यू होतो. संपूर्ण जगात हवेच्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पावणा-यांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. टॅग्स :प्रदूषणनवी दिल्लीpollutionNew Delhi