पोस्टाची ही योजना आहे खास, पैशांची बचत होईल हमखास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 15:42 IST2019-06-10T15:35:41+5:302019-06-10T15:42:59+5:30

पोस्टाच्या छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावरही चांगला फायदा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फक्त सरकारी सुरक्षाच नव्हे, तर चांगला परतावाही मिळतो.
विशेष म्हणजे या योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर आपल्याला करातही सूट मिळते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सीनुसार 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळते.
या बचत योजनांच्या माध्यमातून आपली करातूनही सुटका होऊ शकते. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एनएससी): नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 8.0 टक्क्यांनी व्याज मिळत होते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 8.0 टक्क्यांनी व्याज मिळत होते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता.
पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. आता त्याच्याच वाढ झाली आहे.