'या' राज्यात फक्त ३.५० लाख रुपयांत घर मिळणार, १९ शहरांमध्ये बुकिंग सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:19 PM 2020-09-02T20:19:44+5:30 2020-09-02T20:40:25+5:30
स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली गृहनिर्माण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यात वेळोवेळी घर बुकिंग प्रक्रिया केली जाते.
या योजनेंतर्गत उत्तर प्रदेश गृहनिर्माण विकास परिषदेने राज्यातील १९ शहरांमध्ये ३५१६ प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचे बुकिंग सुरू केले आहे. बुकिंगसाठी ऑनलाईन अर्ज १५ ऑक्टोबरपर्यंत करता येईल.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सर्वाधिक ८१६ घरांची बुकिंग होणार आहे. याशिवाय, गाझियाबादमध्ये ६२४, मेरठमध्ये ४८०, गोंडामध्ये ३९६ घरांचे बुकिंग होईल. तसेच, मैनपुरी, फतेहपूर, हरदोई, रायबरेली आणि मेरठमध्ये ९६-९६ घरांसाठी नोंदणी केली जाईल. कानपूर देहात, कन्नौज, उन्नाव, बहराइच, मऊ, बलरामपूर, कानपूर देहात, कन्नौज, उन्नाव, बहराईच, मऊ, बलरामपूर आणि बाराबंकी या शहरांचाही या यादीत समावेश आहे.
या योजनेंतर्गत गरिबांना केवळ ३. ५० लाख रुपयांमध्ये घर खरेदी करता येईल. त्याअंतर्गत एकूण ३५१६ घरांची बुकिंग होईल. लखनऊमध्ये जास्तीत जास्त ८१६ घरांचे बुकिंग सुरू झाले आहे.
या बुकिंग अंतर्गत केवळ त्यांनाच घर मिळेल, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. राज्यातील गरीब लोकांना फक्त ३.५० लाख रुपयांत घरे मिळणार आहेत. त्यांना ही रक्कम 3 वर्षात परत करावी लागेल.
या घरांचा कार्पेट एरिया २२.२२ स्वेअर मीटर आणि सुपर एरिया ३४.०७ स्केअर मीटर आहे. या घरांच्या बुकिंगसाठी पुढील प्रमाणे बुकिंग करू शकता.
सर्वात आधी https://pmaymis.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करा. त्यानंतर जर तुम्ही कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात असाल तर इतर ३ घटकांवर क्लिक करा.
यानंतर आधार क्रमांक व इतर माहिती भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच, यासाठी अर्जाची फी १०० रुपये आणि ५००० रुपये बँकेत जमा करावे लागतील.