Prashant Kishor : वडील डॉक्टर, आईचा राजकारणाला विरोध, पत्नी...; प्रशांत किशोर यांच्याबद्दल हे माहितीय का? By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 05:05 PM 2024-04-02T17:05:44+5:30 2024-04-02T17:26:17+5:30
Prashant Kishor : निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घेऊया... निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (पीके) हे नेहमीच आपल्या कामाबद्दल खूप उत्साही असतात. याच कारणास्तव ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे कुटुंबीय त्यांच्याबद्दल वारंवार वेळ न दिल्याची तक्रार करतात. काहीवेळा या मुद्द्यावरून त्यांचं घरातील सदस्यांशी भांडणही होतं. प्रशांत किशोर यांच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घेऊया...
प्रशांत किशोर यांचे वडील श्रीकांत पांडे हे डॉक्टर होते. आई सुशीला पांडे या गृहिणी होत्या आणि त्या आपल्या मुलाच्या खूप चांगल्या सपोर्टर होत्या. प्रशांत किशोर यांनी काहीही केलं तरी त्यांना ते बरोबर वाटायचं. पण त्या राजकारणाच्या विरोधात होत्या.
प्रशांत किशोर यांचे मोठे भाऊ अजय किशोर हे आधी पाटणा येथे बिझनेस करायचे. मात्र नंतर ते दिल्लीत आले. त्यांना दोन बहिणी देखील आहेत, त्यापैकी एक दिल्लीत राहते आणि त्यांचे पती आर्मी ऑफिसर आहेत.
प्रशांत किशोर यांच्या पत्नीचं नाव जानवी दास असून त्या मूळच्या आसाममधील गुवाहाटी येथील आहेत. त्या डॉक्टर आहेत. त्यांना एक मुलगा असून तो सध्या आठवीत शिकतो. पत्नी स्वत:ला 'स्मार्ट वर्कर' समजते, तर प्रशांत किशोर त्यांच्याकडे हार्ड वर्कर म्हणून पाहतात.
कधीही वाढदिवस साजरा न करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी प्रेमविवाह केला होता. 20 वर्षांपासून त्यांनी कोणताही चित्रपट पाहिला नसला तरी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते अभिनेते आहेत.
विशेष म्हणजे प्रशांत किशोर सध्या 12 ते 13 हजार रुपये किमतीचे शूज घालतात. त्यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता आणि सांगितलं होतं की, पदयात्रेदरम्यान खूप चालावं लागतं. अशा स्थितीत त्यांचे बूट फक्त चार महिनेच टिकतात.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हा देखील दावा केला आहे की, जन सुराजला मिळणारा निधी/देणग्या ते केवळ चेकद्वारे घेतात. त्यांना आयुष्यात जास्त पैसा नको असतो, उलट मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी त्यांची आशा आहे.
मुलाखतीदरम्यान प्रशांत किशोर यांनी हे देखील सांगितलं की ते 2015 मध्ये बिहारमध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये खूप सक्रिय होते. त्यांना कोणतेही पद मिळवायचं असतं, तर ते त्यांनी तेव्हाच मिळवलं असतं. तेव्हा त्यांना रोखणारं कोणी नव्हतं. एबीपीने न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.