डेबिड कार्ड फ्रॉडपासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:55 IST2019-03-06T17:38:26+5:302019-03-06T17:55:14+5:30

गेल्या काही काळापासून ऑनलाइन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी डेबिट कार्डचा वापर सर्रास होतो. मात्र ऑनलाइन व्यवहारांसाठी डेबिट कार्डपेक्षा क्रेडिट कार्ड हा उत्तम पर्याय आहे. क्रेडिट कार्ड हे डेबिट कार्डच्या तुलनेत अधिक सुरक्षित असते. तसेच क्रेडिट कार्डमधील रकमेची चोरी झाल्यास पैसे परत करण्याची जबाबदारी बँक घेते.

डेबिट कार्डव्दारे एटीएममधून पैसे काढताना एटीएममध्ये इतर कुठलेही डिव्हाइस वा चिप तर नाही ना याची खात्री करून घ्या. तसेच एटीएममध्ये पिन टाकताना ती कुणी पाहू नये याची खबरदारी घ्या.

बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा विमा घेऊन ठेवा, जेेणेकरून तुम्ही अशा फ्रॉडचे शिकार झाल्याच त्याची भरपाई होऊ शकेल.

डेबिट कार्डवरील माहिती कधीही ऑनलाइन सेव्ह करून ठेवू नका. तसे केल्यास ती माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागू शकते. तसेच ऑनलाइन खरेदी करताना संबंधित वेबसाइट सुरक्षित आहे ना याची खात्री करून घ्या.

आपल्या डेबिट कार्डद्वारे बँक खात्यातून रक्कम काढली गेली नाही ना याची खात्री करण्यासाठी बँक स्टेटमेंट सातत्याने तपासत राहा.